संजीदा शेखचं खुलेआम घटस्फोटावर भाष्य; आमिर अली म्हणाला, "दुसऱ्यांवर चिखलफेक..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 13:22 IST2024-06-05T13:21:00+5:302024-06-05T13:22:33+5:30
संजीदाने खुलेआम घटस्फोटावर केलेल्या भाष्यानंतर आता आमिर अलीनेही प्रतिक्रिया दिली आहे.

संजीदा शेखचं खुलेआम घटस्फोटावर भाष्य; आमिर अली म्हणाला, "दुसऱ्यांवर चिखलफेक..."
टीव्ही सेलिब्रिटी आमिर अली (Aamir Ali) आणि संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) एकेकाळचं मोस्ट रोमँटिक कपल. 2020 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला तेव्हा चाहत्यांना धक्काच बसला. संजीदा शेख सध्या 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमधील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय. यानिमित्त संजीदाने अनेक मुलाखती दिल्या. प्रत्येक मुलाखतीत तिला आमिर अलीवरुन प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तिने घटस्फोटामुळे डिप्रेशनमधून बाहेर आल्याचं सांगितलं. संजीदाने खुलेआम घटस्फोटावर केलेल्या भाष्यानंतर आता आमिर अलीनेही प्रतिक्रिया दिली आहे.
संजीदा शेख एका मुलाखतीत म्हणाली, "असे पार्टनर असतात जे तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काहीच करु शकत नाही असं म्हणत तुम्हाला डिवचतात. अशा लोकांपासून दूर राहणंच चांगलं. प्रत्येक नात्यात अशी स्टेज येते जिथे तुम्ही आनंदी असता आणि काही काळाने अडचणी यायला सुरु होतात. तेव्हा तुम्ही आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेता."
संजीदाच्या या मुलाखतीनंतर आमिर अलीने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, "ती जे काही सांगत आहे किंवा जे मी बोलत आहे ते आम्ही एकमेकांबद्दलच बोलत असू असं नाही. आम्ही ५ वर्षांपूर्वीच वेगळे झालो आहे. या दरम्यान तिच्या आयुष्यात असं काही झालं असेल अशीही शक्यता आहे."
तो पुढे म्हणाला, "मला माहित आहे की मी याकाळात कोणत्या फेजमधून गेलो आहे. पण म्हणून सार्वजनिकरित्या कोणावर चिखलफेक करण्याची माझी सवय नाही. मी कधीच कोणाला कमी दाखवत नाही आणि दाखवणारही नाही. विशेषत: त्यांना ज्यांच्यासोबत माझं कधीकाळी नातं होतं."
आमिर अली आणि संजीदा शेख दोघांनी 'क्या दिल मे है' मालिकेत एकत्र काम केले होते. याच सेटवर दोघंही प्रेमात पडले. २०१२ मध्ये त्यांचं लग्न झालं. लग्नाच्या 8 वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. २०२० साली दोघानी एका मुलीलाही दत्तक घेतलं होतं. ती आता संजीदासोबतच राहते.