'या' मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय आमिर अली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 20:30 IST2018-12-18T20:30:00+5:302018-12-18T20:30:00+5:30
आमिर अली एका वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा परत येत आहे आणि शोमध्ये विश्वास ही मुख्य भूमिका साकारणार आहे.

'या' मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय आमिर अली
नवरंगी रे! ही उत्तर प्रदेशमधील गावातील एक परिसराची आणि त्यातील अस्सल, पण इरसाल आणि प्रेमळ पात्रांची कथा आहे. काठावर बसून मजा पाहणाऱ्या समाजाची एका आव्हानातून दुसऱ्या आव्हानाला एका दाव्यात बांधून आणि समस्या सोडविण्यासाठी एकत्र येणारी उपहासात्मक कथा आहे.
आमिर अली एका वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा परत येत आहे आणि शोमध्ये विश्वास ही मुख्य भूमिका साकारणार आहे. युपीमधील एका स्थानिक न्यूज चॅनेलवर काम करणाऱ्या एका धडपडणाऱ्या टीव्ही पत्रकाराची भूमिका तो साकारत असून तो नेहमी नवीन ब्रेकिंग बातमीच्या शोधात असतो त्याची नोकरी कायम ठेवण्यासाठी. तो मनाने अतिशय चांगला असतो, हुशार असतो चतुर असतो आणि त्याचे कान नेहमी मोहल्ल्यातील प्रत्येकजण काय म्हणत आहे याकडे लागलेले असतात. शोमधील मुख्य अभिनेत्री सोबत त्याचे प्रेम-तिरस्काराचे रोमांचक संबंध आहेत.
आमिर अली म्हणाला, “मी दीड वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परत येत आहे आणि नवरंगी रे! मध्ये मी साकारत असलेल्या टिव्ही जर्नलिस्टच्या भूमिके बद्दल मला उत्सुकता आहे. माझी विशिष्ट लकब आणि बोलण्यातील उच्चार अचूक येण्यासाठी मी सर्व न्यूज चॅनेल्स धुंडाळले आहेत. या शो साठी धन्यवाद, त्यामुळे सध्या चालू घडामोडी पूर्णपणे मला माहित आहेत.”