गोकुळधाम सोसायटीत होणार कोविड-19 लसीकरण,वॅक्सीन घेण्यासाठी करणार प्रेरित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 03:51 PM2021-08-19T15:51:51+5:302021-08-19T15:58:52+5:30

गेल्या पंधरा महिन्यांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो आपल्या कथांद्वारे कोरोना-19 बद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी कोरोना-19 च्या सुरुवातीच्या काळापासून मास्क, स्वच्छता आणि सामाजिक अंतराचे महत्त्व कथांद्वारे प्रेक्षकांना सांगितले आहे.

aarak Mehta Ka Ooltah Chashmah Gokuldham Society organizes COVID 19 Vaccination Camps | गोकुळधाम सोसायटीत होणार कोविड-19 लसीकरण,वॅक्सीन घेण्यासाठी करणार प्रेरित

गोकुळधाम सोसायटीत होणार कोविड-19 लसीकरण,वॅक्सीन घेण्यासाठी करणार प्रेरित

googlenewsNext

'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो आपल्या कथेद्वारे कोविड-19 लसीकरणाचे महत्त्व प्रेक्षकांपर्यंत पोहचवणार आहे. कोविड-19 लसीकरणाचे महत्व  प्रेक्षकांपर्यंत पोहचले पाहिजे, म्हणून तारक मेहता का उल्टा चष्मा ने आपल्या शोद्वारे लसीकरणावर एक विशेष भाग तयार केला आहे. लवकरच गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी भिडे सोसायटीमध्ये सर्व गोकुळधाम रहिवाशांसाठी लसीकरण मोहिमेची व्यवस्था करणार आहेत.


कोविड-19 साथीच्या रोगाने केवळ भारतीय अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर लोकांच्या जीवनमानावर आणि व्यवसायावरही परिणाम केला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा आपल्या विशेष भागाद्वारे प्रेक्षकांना  या महामारीशी केवळ लढायला नाही तर त्याला पराभूत करायला मदद करू शकतो. कोविड-19 लसीबाबत अनेकांना अनेक शंका आणि भीती आहे ज्यावर हा शो आपल्या कथेद्वारे मात करण्याचा प्रयत्न करेल आणि कोविड-19 लसीकरणाबद्दल लोकांच्या मनात सकारात्मकता निर्माण करेल.

गेल्या पंधरा महिन्यांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो आपल्या कथांद्वारे कोरोना-19 बद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी कोरोना-19 च्या सुरुवातीच्या काळापासून मास्क, स्वच्छता आणि सामाजिक अंतराचे महत्त्व कथांद्वारे प्रेक्षकांना सांगितले आहे. एवढेच नाही तर, शोमध्ये कोरोना काळात होत असलेल्या औषधांची होर्डिंग, काळाबाजार आणि भेसळ या विषयांवर ही जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

 

 

तारक मेहता का उल्टा चष्मा शो ने प्रेक्षकांना हसवताना नेहमीच त्यांची सामाजिक मूल्ये आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा त्याच्या कथेसह पुन्हा एकदा लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनुभवांवर प्रकाश टाकण्याचा  प्रयत्न करत आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा हा जगातील सर्वात जास्त काळ चालणारा हिंदी डेली कॉमेडी शो आहे आणि शो चे बहुतेक पात्र भारत आणि इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. 2008 पासून प्रसारित होणारा शो, तारक मेहता का उल्टा चष्मा 14 व्या वर्षात आहे आणि त्याचे 3200 पेक्षा अधिक भाग प्रसारित झाले आहेत.

Web Title: aarak Mehta Ka Ooltah Chashmah Gokuldham Society organizes COVID 19 Vaccination Camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.