"मला तो आवडायचा आणि त्याला माझीच बेस्ट फ्रेंड", आर्यानं क्रशमुळे पहिल्यांदा बनवलं होतं रॅप!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 11:02 AM2024-09-22T11:02:00+5:302024-09-22T11:02:51+5:30

इयत्ता आठवीत असताना तिने पहिल्यांदा रॅप बनविले होते. 

Aarya Jadhao on her rap journey | Bigg Boss Marathi 5 | "मला तो आवडायचा आणि त्याला माझीच बेस्ट फ्रेंड", आर्यानं क्रशमुळे पहिल्यांदा बनवलं होतं रॅप!

"मला तो आवडायचा आणि त्याला माझीच बेस्ट फ्रेंड", आर्यानं क्रशमुळे पहिल्यांदा बनवलं होतं रॅप!

Aarya Jadhav: बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi New Season) घरात हिंसा केल्यामुळे आर्या जाधव हिला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं आहे. त्यानंतर आर्याने घराबाहेर येताच माध्यमांना मुलाखती देत आपली बाजू मांडली. आर्या ही एक जबरदस्त रॅपर आहे. तिचे रॅपचे मोठे चाहते आहेत. नुकतेच एका मुलाखतीत तिने सर्वात आधी रॅप कधी बनवलं होतं, याबद्दल सांगितलं. खरेतर इयत्ता आठवीत असताना तिने पहिल्यांदा रॅप बनविले होते. 

आर्याने एबीपी माझाशी बोलातना सांगितलं की,  "मी आठवीत होते. २०१२ ची गोष्ट आहे. तेव्हा हनी सिंगचं ब्रेकअप पार्टी हे गाणं आलं होतं. ते गाणं मला खूप आवडायचं. तेव्हा मला एक मुलगा आवडत होता. क्रश होता फक्त. त्याला मी कधी सांगितलं नाही, की तो मला आवडतो. त्याला एक मुलगी आवडायला लागली होती आणि ती मुलगी माझीच बेस्ट फ्रेंड होती. तेव्हा मला खूप राग आला आणि मी ब्रेकअप पार्टीचं फिमेल व्हर्जन बनलवं. तेव्हा आयुष्यात मी पहिल्यांदा लिहलं. मला माहिती नव्हतं. याला रॅप म्हणतात".

पुढे आर्या म्हणाली, "2018 मध्ये माझा अपघात झाला. यामध्ये माझ्या दोन्ही पाय आणि पाठीच्या मणक्याला दुखापत झाली होती. तेव्हा बेड रेस्ट असल्याने वेळच वेळ होता. करायला काहीच नव्हतं. तेव्हा मी पुन्हा लिहायला सुरु केल्याचं आर्याने सांगितलं. रफ्तारचं एक  "बेटियों को मारते, बेटियां ना पालते"हे रॅप खूप व्हायरल झालं होतं. तेव्हा मी विचार केला की अरे एक मुलगा एका मुलीबद्दल इतक्या सुंदररित्या लिहू शकतो. तर मग मी का लिहू शकत नाही. तोपर्यंत माझ्या लिखानाला मी खूप हलक्यात घेत होते. मग लिहलं आणि सोशल मीडियावर टाकू लागले तर लोकांना ते आवडू लागलं. त्यानंतर मी लिहू लागले आणि हिपहॉपमध्ये आले". 


आर्या जाधवचा 'क्यूके' नावाचा स्वतःचा बँड आहे, जो यू ट्यूबवर खूप धमाल करत आहे. आर्याने येथील होली क्रॉस हायस्कूलमधून दहावी तर गोल्डन किड्समधून बारावी उत्तीर्ण केली.  अमरावती ते मुंबई असा तिचा प्रवास आहे. तिचं 'नऊवारी' हे रॅप प्रचंड गाजलं. याशिवाय 'सायको साँग','ले जा' ही गाणीही लोकप्रिय झाली. आर्याचे वडील हेमंत जाधव हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. तर आर्याची आई रश्मी या गृहिणी असून, तिचा लहान भाऊ शिवराज हा इंजिनिअर आहे.

Web Title: Aarya Jadhao on her rap journey | Bigg Boss Marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.