अभिजीत खांडकेकर आणि सुखदाने नवीन घरात केला गृह प्रवेश, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:00 IST2022-05-28T16:59:44+5:302022-05-28T17:00:06+5:30
Abhijeet Khandkekar And Sukhda Khandkekar:अभिजित आणि सुखदा खांडकेकरच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

अभिजीत खांडकेकर आणि सुखदाने नवीन घरात केला गृह प्रवेश, फोटो झाले व्हायरल
अभिनेता अभिजित खांडकेकर (Abhijeet khandekekar) आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर (Sukhda khandekar) यांची जोडी मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यापैकी एक आहे. अभिजित आणि सुखदा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे असून ते या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतेच त्या दोघांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
अभिजित आणि सुखदाने मुंबईत नवीन घर घेतलं आहे. त्याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केले आहेत. त्यांनी मोठ्या थाटामाटात आपल्या नव्या घराचा गृहप्रवेश सोहळा पार पाडला. या दोघांनी पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने सर्व पूजाविधी पार पाडल्या. या समारंभात त्यांच्या कुटुंबातील लोक आणि इंडस्ट्रीतील काही जवळचे लोक उपस्थित होते. त्या दोघांनी शेअर केलेले घराचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
अभिजित खांडकेकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच गीत गात आहे’ या मालिकेत काम करतो आहे. तर सुखदा ‘पुण्यश्लोक आहिल्याबाई’ या हिंदी मालिकेत काम करत आहे.