अभिजीत आणि सुखदा खांडकेकरच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 16:26 IST2024-02-01T16:25:35+5:302024-02-01T16:26:06+5:30
Abhijeet Khandkekar and Sukhda Khandkekar : अभिजीतने १ फेब्रुवारी २०१३ रोजी सुखदासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांचे लव्ह मॅरेज आहे.

अभिजीत आणि सुखदा खांडकेकरच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट
अभिनेता अभिजित खांडकेकर (Abhijeet khandekekar) आणि सुखदा खांडकेकर (Sukhda khandekar) यांची जोडी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यापैकी एक आहे. अभिजित आणि सुखदा सोशल मीडियावर सक्रिय असून ते या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान आज त्यांच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाली असून त्या निमित्ताने अभिजीत खांडकेकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिजीत खांडकेकरने सुखदासोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, एकत्र प्रवास करण्याच्या या प्रवासात आनंदाची ११ वर्ष! त्याच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
अभिजीतने १ फेब्रुवारी २०१३ रोजी सुखदासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांचे लव्ह मॅरेज आहे. एका फेसबुक मॅसेजमुळे त्यांच्या दोघांत मैत्री झाली. नाशिकचा मुलगा मालिकेत काम करणार असल्याने सुखदाला कौतुक वाटले आणि तिने अभिजीतला मॅसेज केला. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले आणि काही दिवसांच्या मैत्रीनंतर अभिजीतने सुखदाला लग्नासाठी विचारले.
वर्कफ्रंट...
अभिजित खांडकेकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच गीत गात आहे’ या मालिकेत काम करतो आहे. तर सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. तिने अहिल्याबाई होळकर या मालिकेत द्वारकाबाईची भूमिका साकारली आहे. सुखदाने धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.