अभिजीत खांडककेर एन्जॉय करतोय निवांत क्षण, मान्सून ट्रीपचा फोटो केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 06:30 AM2019-06-20T06:30:30+5:302019-06-20T06:30:30+5:30
मान्सून ट्रीप डेस्टिनेशन कोणतं हेही अभिजीतनं विचारलं आहे. त्याच्या या आवाहनाला बराच प्रतिसाद मिळत आहे.
मान्सूनला अजून सुरूवातही झालेली नाही. पावसाच्या सरी आता कुठे बरसू लागल्या आहेत. मात्र या वातावरणाची जादू अशी आहे की कुणीही पिकनिकला किंवा फिरायला जाण्याचा मोह आवरू शकत नाही. सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मग सेलिब्रिटी प्रत्येकालाच पावसाळी पिकनिक, ट्रेकला जायला आवडतं. मराठमोळा अभिनेता अभिजीत खांडकेकर नुकतंच मान्सून ट्रीपवर गेला होता. साहसी आणि धाडसी गोष्टीची आवड असलेला अभिजीत निवांत क्षणांचा आनंद घेत असल्याचं एका फोटोत पाहायला मिळत आहे. स्वतः अभिजीतने हा फोटो शेअर केला आहे. शुटिंगपासून मोकळं झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. अभिजीत नेमकं कोणत्या ठिकाणी फिरायला गेला याचा उलगडा त्याने केलेला नाही.
मात्र प्रत्येकाने अशी मान्सून ट्रीप केलीच पाहिजे असं कॅप्शन अभिजीतने या फोटोला दिली आहे. तसंच प्रत्येकाला आवडतं मान्सून ट्रीप डेस्टिनेशन कोणतं हेही अभिजीतनं विचारलं आहे. त्याच्या या आवाहनाला बराच प्रतिसाद मिळत आहे. अभिजीतचे फॅन्स त्यांचे आवडतं मान्सून ट्रीप डेस्टिनेशन कमेंटमध्ये कळवत आहेत. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अभिजीत खांडकेकर गुरू ही व्यक्तीरेखा साकारतोय. त्याची ही भूमिका रसिकांना भावतेय.
अभिजीतप्रमाणेच त्याची पत्नी सुखदा हे दोघंही अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'ध्यानीमनी', 'भय', 'ढोलताशे' या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्यात. दुसरीकडे सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे.'हीच तर प्रेमाची गंमत आहे' या नाटकात सुखदाने डॉ. अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती.'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.