अभिजीत खांडकेकरने शेअर केला पत्नीसोबतचा रोमाँटिक फोटो, फेसबुकवरुन सुरु झाली होती लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 17:35 IST2021-02-01T17:34:13+5:302021-02-01T17:35:12+5:30

फेसबुकवरील या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.

Abhijeet khandkekar shared a romantic photo with his wife sukhada khandkekar | अभिजीत खांडकेकरने शेअर केला पत्नीसोबतचा रोमाँटिक फोटो, फेसबुकवरुन सुरु झाली होती लव्हस्टोरी

अभिजीत खांडकेकरने शेअर केला पत्नीसोबतचा रोमाँटिक फोटो, फेसबुकवरुन सुरु झाली होती लव्हस्टोरी

अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपलपैकी एक आहेत. अभिजीत आणि सुखदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात आणि त्यांच्या फोटोना चाहत्यांनी पसंतीदेखील मिळते. अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी आणि अभिनेत्री सुखदासोबतचा रोमाँटिक फोटो शेअर केला आहे. दोघेही सध्या लग्नाची अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी केरळमधील मुन्नरला गेले आहेत. तिथे दोघे एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसतायेत.  

अभिजीतचा नाटकातील आणि सुखदाच्या डान्समधील एका कॉमन फ्रेंडमुळे दोघांची एकमेकांशी ओळख होती. मात्र दोघं कधीही एकमेकांशी बोलले नव्हते. त्याच काळात अभिजीतची माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेमुळे अभिजीत रसिकांचा लाडका बनला होता. ही मालिका पाहून सुखदाने फेसबुकवर अभिजीतचं कौतुक केले होते. यानंतर अभिजीत आणि सुखदा यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. फेसबुकवरील या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. 

 1 फेब्रुवारी 2013 रोजी अभिजीत आणि सुखदा यांचं लग्न मोठ्या थाटात पार पडले होते. छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'ध्यानीमनी', 'भय', 'ढोलताशे' या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्यात. दुसरीकडे सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे.  'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.

Web Title: Abhijeet khandkekar shared a romantic photo with his wife sukhada khandkekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.