"यशस्वी तर आहेसच... तुझ्या...", अभिजीत चव्हाणची विजू मानेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 17:48 IST2024-07-26T17:47:55+5:302024-07-26T17:48:57+5:30
Abhijeet Chavan And Viju Mane : अभिजीत चव्हाणने विजू मानेसोबतचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"यशस्वी तर आहेसच... तुझ्या...", अभिजीत चव्हाणची विजू मानेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
अभिनेता अभिजीत चव्हाण (Abhijeet Chavan) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने नाटक, मालिका, चित्रपटात विविधांगी भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत त्याने साकारलेली शशिकांतची ग्रे शेड भूमिका रसिकांच्या पसंतीस पडली आहे. दरम्यान अभिजीतने लेखक, दिग्दर्शक विजू माने(Viju Mane)च्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिजीत चव्हाणने विजू मानेसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, आमचं काळजीवाहू सरकार. विजूबद्दल लिहिताना हाच प्रश्न सतावतो....सुरूवात कुठून करायची.. कारण या नक्कल व्यवसायात आमच्या अस्सल मैत्रीचा कॅनव्हास खूप भव्य आहे.. आम्ही जेव्हा कोणीही नव्हतो तेव्हापासून सुरू झालेली मैत्री... आजही पाय रोवून उभी आहे.... अनेकांनी प्रयत्न केले... पण ती काही भंगत नाही... कारण यात ना मागणं आहे ना देणं... निरपेक्ष आणि निखळ मैत्री...
त्याने पुढे म्हटले की, त्याच्या अतिप्रचंड व्यस्तते मधून आमच्यावर माया करण्याची आमचे कान ओढण्याची वेळ प्रसंगी आमच्या शिव्या खाण्याची त्याची हातोटी आणि तळमळ विलक्षण आहे ... म्हणूनच आमचं काळजीवाहू सरकार आहे ते.... अशीच आमची काळजी घेत राहा... यशस्वी तर आहेसच .... तुझ्या यशाचा डंका जगभर घुमू दे.. उत्तम लेखक होण्याची क्षमता बाळगून आहेस तर एक मस्त नाटक लिही.. हे कानीकपाळी ओरडून झालंय... ते पूर्णत्वाला जाऊदे रे महाराजा.... बाकी पार्टी देशील तेंव्हा उरलेले आशिर्वाद शुभेच्छा देईन.... खूप खूप प्रेम रे माझ्या लाडक्या विजू... खूप साऱ्या पाप्प्या... हॅप्पी बर्थडे अॅण्ड लव्ह यू.