Ali Baba Daastaan E Kabul 2: शिजान खानच्या जागी अभिषेक निगमला पाहून भडकले चाहते; म्हणाले, आम्हाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:31 IST2023-01-17T15:30:52+5:302023-01-17T15:31:33+5:30
Ali Baba Dastaan-E-Kabul 2, Sheezan Khan : तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर 'अली बाबा दास्तान ए काबुल' ही मालिका चर्चेत आली आहे.

Ali Baba Daastaan E Kabul 2: शिजान खानच्या जागी अभिषेक निगमला पाहून भडकले चाहते; म्हणाले, आम्हाला...
तुनिशा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर 'अली बाबा दास्तान ए काबुल' (Ali Baba Dastaan-E-Kabul) ही मालिका चर्चेत आली आहे. या मालिकेत तुनिशा आणि तिचा बॉयफ्रेन्ड शिजान खान (Sheezan Khan) लीड रोलमध्ये होते. तुनिशाच्या आत्महत्येनंतर शिजान तुरूंगात आहे. यामुळे 'अली बाबा दास्तान ए काबुल'चं शूटींग खोळंबलं होतं. पण आता या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये शिजानच्या जागी अभिनेताअभिषेक निगम दिसणार आहे. अर्थात चाहते अभिषेकला पाहून निराश आहेत. प्रोमो रिलीज झाल्यानंतर शिजान खानच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मालिकेत शिजान खानची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्याला परत आणा अशी मागणी चाहते करत आहेत.
'अली बाबा दास्तान-ए-काबुल 2' चा प्रोमो सोनी सबच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. यात अभिषेक निगमचा चेहरा दिसत नाही. पण हा प्रोमो समोर येताच, शिजानचे चाहते भडकले आहेत. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपली नाराजी व्यक्त केली आहे. शोमध्ये फक्त शिजान खान हाच अली बाबाची भूमिका साकारू शकतो. अभिषेक निगमला घेऊन निर्मात्यांनी मोठी चूक केली आहे, असं एका चाहत्याने म्हटलं आहे. अली बाबाच्या भूमिकेसाठी शिजान हाच बेस्ट होता, तो नसेल तर मालिका बंद पडणार, अशी कमेंट अन्य एका चाहत्याने केली आहे. शिजानची गोष्टचं न्यारी आहे, तो नसेल तर तुमचा शो कोण बघणार, असं एकाने म्हटलं आहे. आम्हाला शिजान हवा, नाहीतर आम्ही मालिका बघणार नाही, अशा कमेंट्ही अनेक चाहत्यांनी केल्या आहेत.
तुनिशा शर्माने 24 डिसेंबर रोजी 'अली बाबा दास्तान-ए-काबुल'च्या सेटवर शूटिंगदरम्यान आत्महत्या केली होती. यानंतर तुनिशाची आई वनिता शर्मा यांनी शिजानन खानविरोधात एफआयआर दाखल केला. तेव्हापासून शिजान खान तुरुंगात आहे. त्याच्यावर तुनिशा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.