तुझ्यात जीव रंगला'ने गाठला ५०० भागांचा यशस्वी टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 10:35 AM2018-05-02T10:35:48+5:302018-05-03T09:30:38+5:30

अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने नुकतंच ५०० यशस्वी भागांचा टप्पा ...

Achieving the 500-phase successful stage of life in your life | तुझ्यात जीव रंगला'ने गाठला ५०० भागांचा यशस्वी टप्पा

तुझ्यात जीव रंगला'ने गाठला ५०० भागांचा यशस्वी टप्पा

googlenewsNext
दी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने नुकतंच ५०० यशस्वी भागांचा टप्पा गाठला. या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे हिसगळी पात्र महाराष्ट्राच्या घरा घरात पोहोचली आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही केलं तर कुस्ती या खेळाचं महत्व देखील दर्शवलं. अंजली आणि राणा यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा, कठीण परिस्थितीत न डगमगता, एकमेकांच्या साथीने प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची दोघांची वृत्ती प्रे
क्षकांना भावली. लोप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मलिकने प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्याने मैलाचा दगड पार पडला आहे.

५०० भाग पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त करताना अंजली म्हणजेच अभिनेत्री अक्षय देवधर म्हणाली, मी सर्वप्रथम माझ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करू इच्छिते. प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असंच राहू दे. मला यामालिकेचा एक महत्वाचा हिस्सा बनवल्याबद्दल मी माझ्या संपूर्ण ;तुझ्यात जीव रंगला;च्या टीमची आभारी आहे. राणादा म्हणजेच हार्दिक जोशी म्हणाला, मला खूप आनंद होतोय की तुझ्यात जीव रंगला; या मालिकेने ५०० भाग पूर्ण केले. यात संपूर्ण टीमच श्रेय  आहे. प्रेक्षकांचं आमच्यावरच प्रेम दिवसागणिक वाढत जावं अशी मी प्रार्थना करतो. हा एक सुंदर प्रवास आहे आणि मला आशा आहे की आम्ही असेच अनेक टप्पे पार करू. 

छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका रसिकांमध्ये दिवसेंदिवस हिट ठरत आहे. मालिकेतील राणा दा आणि पाठकबाईची केमिस्ट्री रसिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. चालतंय की म्हणत मनं जिंकणा-या राणा दा सोबत मालिकेतील शांत, संयमी आणि सोज्वळ अशा पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरसुद्धा लोकप्रिय ठरली आहे. 
 

Web Title: Achieving the 500-phase successful stage of life in your life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.