‘गुलाम’ मालिकेत अ‍ॅक्शनसिन्सचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 05:20 PM2017-01-01T17:20:14+5:302017-01-01T17:22:28+5:30

‘मोहेंजोदडो’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘हॅपी भाग जाएगी’ या चित्रपटांचा तसेच सलमान खानच्या आगामी ‘ट्यूबलाईट’ या सिनेमाचा अ‍ॅक्शन डिरेक्टरने ‘गुलाम’ ...

Acidicon fever in 'slave' series | ‘गुलाम’ मालिकेत अ‍ॅक्शनसिन्सचा थरार

‘गुलाम’ मालिकेत अ‍ॅक्शनसिन्सचा थरार

googlenewsNext
ोहेंजोदडो’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘हॅपी भाग जाएगी’ या चित्रपटांचा तसेच सलमान खानच्या आगामी ‘ट्यूबलाईट’ या सिनेमाचा अ‍ॅक्शन डिरेक्टरने ‘गुलाम’ मालिकेसाठीही भन्नाट अ‍ॅक्शनसिन्स डिरेक्ट केले आहेत. अमर शेट्टी हा स्टंट डिरेक्टर म्हणून लोकप्रिय आहे. ‘नागार्जुन- एक योध्दा’ या  मालिकेनंतर आता तो गुलाम या मालिकेतील अ‍ॅक्शन सिन्सवर मेहनत घेतोय. 

अमर शेट्टी याच्या मते, चित्रपटांतील अ‍ॅक्शन प्रसंगांपेक्षा टीव्ही मालिकांतील अ‍ॅक्शन प्रसंगांचे दिग्दर्शन करणे अवघड आहे, कारण या प्रसंगांची तालीम करण्यासाठीही टीव्ही कलावंतांना वेळ मिळत नाही. परंतु टीव्ही मालिकांतील कलाकारांना मी अधिक श्रेय देऊ इच्छितो; कारण आम्ही बसविलेल्या या अ‍ॅक्शन प्रसंगांची तालीम करण्यासही त्यांच्याकडे वेळ नसतो. त्यामुळे उपलब्ध वेळेतच त्यांना हे प्रसंग साकारावे लागतात. मी बसविलेले अ‍ॅक्शन प्रसंग साकारण्यासाठी चित्रपटाच्या नायकाने आठ दिवस घेतले असते.

आगामी ‘गुलाम’ या मालिकेसाठी तोच प्रसंग परमने (‘गुलाम’ मालिकेचा नायक) केवळ आठ तासांत, तेही कोणताही सराव न करता साकारला! तो प्रसंग अप्रतिम ठरला आहे. या प्रसंगातील दोन्ही कलाकारांनी- विकास माणकताल आणि परमसिंह यांनी हा प्रसंग स्वत:च साकारला आणि बॉडी डबलचा वापर करण्यास नकार दिला. त्या मालिकेत आम्ही जे काम केलं आहे, ते अतिशय सरस उतरलं आहे, याबद्दल माझी पूर्ण खात्री असल्याचेही त्याने सांगितले. 

Web Title: Acidicon fever in 'slave' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.