अभिनेता आशय कुलकर्णी 'मुरांबा' मालिकेत साकारणार निगेटिव्ह भूमिका, म्हणाला - खलनायक साकारताना...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 07:36 PM2024-03-26T19:36:34+5:302024-03-26T19:36:59+5:30

Aashay Kulkarni : 'मुरांबा' मालिकेत लवकरच रेवाचा नवरा म्हणजेच अथर्वची एण्ट्री होणार आहे. अभिनेता आशय कुलकर्णी रेवाच्या नवऱ्याची म्हणजेच अथर्वची भूमिका साकारणार आहे.

Actor Aashay Kulkarni will play a negative role in the serial 'Muramba', said - while playing the villain... | अभिनेता आशय कुलकर्णी 'मुरांबा' मालिकेत साकारणार निगेटिव्ह भूमिका, म्हणाला - खलनायक साकारताना...

अभिनेता आशय कुलकर्णी 'मुरांबा' मालिकेत साकारणार निगेटिव्ह भूमिका, म्हणाला - खलनायक साकारताना...

स्टार प्रवाहच्या मुरांबा (Muramba) मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अक्षय आणि रमाची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी ठरत आहे. अक्षय आणि रमाच्या या प्रेमाच्या मुरांब्यात रेवा मात्र अडसर ठरतेय. वेगवेगळी कारस्थानं करुन रमा आणि अक्षयला वेगळं करु पहाणाऱ्या रेवाच्या आयुष्यात मात्र आता नवं वादळ येणार आहे. मालिकेत लवकरच रेवाचा नवरा म्हणजेच अथर्वची एण्ट्री होणार आहे. अभिनेता आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) रेवाच्या नवऱ्याची म्हणजेच अथर्वची भूमिका साकारणार आहे.

आशय म्हणाला की, स्टार प्रवाहसोबत काम करण्याची इच्छा होती ती या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होते आहे. जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा मालिकेत काम करतो आहे. मुरांबा मालिकेत मी खलनायक साकारणार आहे. खलनायक साकारताना पात्र एका साच्यात अडकत नाही. त्यामुळे नवनवे प्रयोग करण्याची मुभा असते. हळूहळू मला हे पात्र गवसतं आहे. 

मालिकेच्या सेटवर खेळीमेळीचं वातावरण

तो पुढे म्हणाला की, शशांक केतकरसोबत मी याआधी काम केलं आहे त्यामुळे आमची मैत्री होतीच. इतर कलाकारांसोबतही छान गट्टी जमली आहे. मुरांबा मालिकेच्या सेटवर खेळीमेळीचं वातावरण आहे. त्यामुळे नवं कुटुंब मिळालं आहे असं म्हणता येईल. अथर्वच्या येण्याने मालिकेत नेमके कोणते नवीन ड्रामा घडणार हे पाहाणे उत्सुकतेचे ठरेल.
 

Web Title: Actor Aashay Kulkarni will play a negative role in the serial 'Muramba', said - while playing the villain...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.