अभिनेता आस्ताद काळेची लवकरच होणार 'या' मालिकेत दमदार एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 13:06 IST2021-01-20T13:03:40+5:302021-01-20T13:06:40+5:30
स्ताद काळेने अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेता आस्ताद काळेची लवकरच होणार 'या' मालिकेत दमदार एंट्री
अभिनेता आस्ताद काळे हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. एक उत्तम कलाकार असलेला आस्ताद उत्तम गायकही आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात उपविजेते पद पटकावलं होतं.लवकरच आस्तादची चंद्र आणि साक्षीला मालिकेत एंट्री होणार आहे.
चंद्र आहे साक्षीला मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. श्रीधरने स्वातीसोबत पळून जाऊन लग्न केले. त्याने रचलेल्या जाळ्यात स्वाती पुरेपूर अडकली आणि तिने लग्नास होकार दिला. आता कुठे स्वाती आणि श्रीधरच्या संसाराला सुरूवात झाली होती.पण, श्रीधरचा खोटेपणा, तो लपवत असलेले सत्य आता स्वातीसमोर आले आहे. श्रीधरचा खरा चेहरा स्वातीसमोर आला आहे. श्रीधरवर जिवापाड प्रेम करणारी स्वाती श्रीधर आणि सुमनचं खरं नातं सामोरं आल्याने एकटी पडली आहे. या सगळ्याला ती कशी सामोरी जाणार ? आलेल्या संकटाला ती कशी उत्तर देणार ? श्रीधरला शिक्षा मिळवून देणार ? असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. पण या सगळ्यामध्ये आता मालिकेमध्ये एका आस्ताद काळेची एंट्री होणार आहे. आता मालिकेमध्ये त्याची नक्की काय भूमिका असणार आहे ? त्याच्या येण्याने नक्की काय घडेल ? श्रीधर – स्वातीच्या आयुष्यात काय उलथापालथ होईल ? हे सगळे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
आपल्या अभिनयाने आस्तादने रसिकांची मनं जिंकली आहेत. अस्ताद काळेने अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचे 'तिला काही सांगायचंय' हे नाटक रंगभूमीवर तुफान गाजले होते.