‘स्टार परिवार पुरस्कार 2018’मध्ये सर्वोत्कृष्ट वडील ठरला 'हा' अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 02:16 PM2018-10-29T14:16:17+5:302018-10-29T14:19:50+5:30
सिकंदरच्या भूमिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट वडिलांचा’ पुरस्कार अभिनेता मोहित मलिकला मिळाला. हा पुरस्कार मोहित मलिकसाठी आश्चर्याचा धक्का बसला.
यंदाच्या ‘स्टार परिवार पुरस्कार 2018' सोहळ्यात अनेक भावूक प्रसंग पाहायला मिळणार आहेत. सिकंदरच्या भूमिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट वडिलांचा’ पुरस्कार अभिनेता मोहित मलिकला मिळाला. हा पुरस्कार मोहित मलिकसाठी आश्चर्याचा धक्का बसला.
अर्थात सिकंदरच्या भूमिकेबद्दल मोहितला ‘सर्वोत्कृष्ट वडिलांचा' पुरस्कार मिळाला, यात काहीच नवल नव्हे; कारण त्याने आपण त्यास लायक आहोत, हे मोहितने वेळोवेळी सिध्द केले आहे. याबद्दल आपला आनंद व्यक्त करताना मोहित म्हणाला, “हा पुरस्कार मिळणं हा माझा बहुमानच असून मला त्यामुळे अतिशय आनंद झाला आहे. हा पुरस्कार खरंतर माझ्या वडिलांनाच मिळाला आहे, कारण तेच या भूमिकेमागील माझं प्रेरणास्थान आहे. मी त्यांनाच डोळ्यांसमोर ठेऊन ही भूमिका साकारली होती आणि आता त्या भूमिकेची दखल घेतली गेल्याचं पाहून मी भारवून गेलो आहे. माझे वडील हेच माझे आदर्श असून त्यांनीच मला आतापर्यंत सर्व काही शिकविलं आहे. त्यामुळे या पुरस्काराचं माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. मला ही भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी ‘स्टार परिवार पुरस्कारां’चा आभारी आहे.” प्रेक्षकांनी ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेतील सिकंदरच्या भूमिकेला उदंड प्रतिसाद दिला असून त्या व्यक्तिरेखेवर प्रेमाचा चौफेर वर्षाव होत आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘स्टार परिवार पुरस्कार 2018 सोहळा’ हा हास्याची कारंजी, मनोरंजनाने परिपूर्ण भरलेला उत्सवच आहे.