भाऊ कदमच्या लेकीचा आहे स्वत:चा व्यवसाय; घरखर्चात वडिलांना लावते हातभार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 05:21 PM2023-05-09T17:21:32+5:302023-05-09T17:22:17+5:30
Mrunmayee kadam: वयाच्या १८ व्या वर्षी मृण्मयीने हा ब्रँड सुरु केला. तसंच ती युट्यूबरदेखील आहे.
मराठी कलाविश्वातील अत्यंत साधं आणि प्रेमळ व्यक्तीमत्व म्हणजे भालचंद्र कदम अर्थात भाऊ कदम (bhau kadam). खऱ्या आयुष्यात एकदम शांत असलेले भाऊ कदम ज्यावेळी मंचावर एन्ट्री घेतात त्यावेळी संपूर्ण माहोल बदलून जातो. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. विशेष म्हणजे गेल्या काही काळात भाऊ कदम यांच्यासोबत त्यांच्या थोरल्या लेकीचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा होऊ लागली. त्यांची लेक प्रचंड गुणाची असून ती स्वत: एक व्यवसायिक आहे
भाऊ कदमच्या थोरल्या लेकीचं नाव मृण्मयी असं असून तिने के.जी. जोशी आणि एन.जी.बेडेकर या महाविद्यालयातून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मृण्मयी एक व्यवसायिक असण्यासोबतच युट्यूबरदेखील आहे. २०२० मध्ये तिने तिचा स्वत:चा 'तारुंध्या' हा ब्रँड सुरु केला आहे.
नेमका काय आहे मृण्मयीचा व्यवसाय
मृण्मयीच्या ब्रँडचं नाव तारुंध्या असं आहे. या ब्रँड अंतर्गत ती ट्रेंडी हेअर बो म्हणजेच Scrunchies तयार करते. तिच्या या व्यवसायासाठी तिला तिच्या आईने सर्वात जास्त मदत केली. तर, वडिलांनी भाऊ कदम यांनी खंबीर पाठिंबा दिला.
दरम्यान, वयाच्या १८ व्या वर्षी मृण्मयीने हा ब्रँड सुरु केला. तसंच ती युट्यूबरदेखील आहे. या दोन्ही कामात आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा असल्याचं अलिकडेच तिने एका व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. सोबतच त्यांचे आभारही मानले होते.