'हास्यजत्रे'च्या सेटवर यायचे धमक्यांचे फोन, भूषण कडू म्हणाला - पैशांच्या हव्यासापोयी त्याने...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 01:00 PM2024-05-15T13:00:41+5:302024-05-15T13:03:30+5:30

"सेटवर धमक्यांचे फोन यायचे म्हणून मला.."; भूषण कडूने सांगितलं 'हास्यजत्रा' सोडण्यामागचं खरं कारण text: "डॉक्टरांनी सांगितला ब्रेन हॅमरेजचा धोका"

actor bhushan kadu talk about why he exit maharashtrachi hasyajatra show | 'हास्यजत्रे'च्या सेटवर यायचे धमक्यांचे फोन, भूषण कडू म्हणाला - पैशांच्या हव्यासापोयी त्याने...

'हास्यजत्रे'च्या सेटवर यायचे धमक्यांचे फोन, भूषण कडू म्हणाला - पैशांच्या हव्यासापोयी त्याने...

भूषण कडू हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. भूषणला आपण आजवर विविध सिनेमांमधून, नाटक आणि मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. भूषण सध्या मनोरंजन विश्वात काम करत नाहीय. करिअरच्या शिखरावर असताना भूषणने इंडस्ट्रीतून Exit घेतली. त्याच्या बायकोचंही काही वर्षांपुर्वी निधन झालं. त्यामुळे भूषण प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये दुःखाचा सामना करत आहे. अशातच लोकमत फिल्मीशी बोलताना भूषणने त्याला आलेले धमक्यांचे फोन आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' त्याची झालेली Exit याबद्दल भाष्य केलंय. 

भूषणने लोकमत फिल्मीसोबत बोलताना खुलासा केलाय. भूषणने एका व्यक्तीकडून पैसे उधार घेतले होते. पुढे तो व्यक्ती भूषणच्या मागे पैशांसाठी तगादा लावायचा. भूषण जसं जमेल तसं पैसे द्यायचा. पण पुढे हव्यासापोटी तो व्यक्ती भूषणच्या जास्तच मागे लागायला लागला. भूषणला या गोष्टीचा प्रचंंड त्रास व्हायचा. तो त्यावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'l मालिकेचं शूटींग करत होता. याशिवाय इतर व्यावसायिक नाटकातही कामं करत होता. काम करताना सेटवर कोणी अनोळखी व्यक्ती दिसली तर भूषणला धास्ती वाटायची. हा व्यक्ती माझ्याकडून पैशांची वसूली करायला आलाय, असं त्याला वाटायचं. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमचे निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे कलाकारांचं मानधन वेळेत करतात. पण कोरोना काळात गोस्वामींना कोरोना झाल्याने ते होम क्वारंटाईन होते. त्यावेळी पेमेंट थांबलं. भूषणला यामुळे प्रचंड आर्थिक त्रास झाला. याचदरम्यान त्याला बीपीची समस्या निर्माण झाली. आणि एकदा भूषण चक्कर येऊन कोसळला. त्याने कसाबासा मित्राशी संपर्क साधून त्याला बोलावून घेतलं. मित्र भूषणला रिक्षाने हॉस्पीटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी सांगितलं जास्त स्ट्रेस आणि प्रेशरमुळे भूषणला हा त्रास झालाय. परिणामी त्याला ब्रेन हॅमरेजही होऊ शकतो. 

पुढे भूषणने मित्राला सांगून त्याचा फोन स्वीच ऑफ केला. हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्याने भूषणला महाराष्ट्राची हास्यजत्राच्या शूटींगला जाता आलं नाही. कलाकाराची पाठ फिरली की त्याच्यामागे गॉसिप सुरु होतात. असंच भूषणच्या बाबतीत काहीसं झालं. कोणीतरीअफवा पसरवली की तो ड्रिंक करुन कुठेतरी पडला असेल,  किंवा त्याला दुसरं काम मिळालं असेल वगैरे वगैरे. या सर्व घटनांमुळे भूषणला मनाविरुद्ध महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडावा लागला, असं त्याचं म्हणणं आहे.

Web Title: actor bhushan kadu talk about why he exit maharashtrachi hasyajatra show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.