हा अभिनेता थोडक्यात वाचला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2016 01:02 PM2016-11-12T13:02:43+5:302016-11-12T13:02:43+5:30
अनेकवेळा चित्रीकरण करताना कलाकार आपल्या जीवाची बाजी लावतात. स्टंट करताना तर जीव मुठीत धरूनच ते चित्रीकरण करत असतात याचा ...
अ ेकवेळा चित्रीकरण करताना कलाकार आपल्या जीवाची बाजी लावतात. स्टंट करताना तर जीव मुठीत धरूनच ते चित्रीकरण करत असतात याचा प्रत्यय नुकताच आला. कारण प्रिन्स नरुलासोबत बढो बहू या मालिकेच्या सेटवर एक अपघात घडला.
मालिकेच्या पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना आता कोमल म्हणजेच बढो आणि लकी यांचे लग्न पाहायला मिळणार आहे. पण लकीला बढोसोबत लग्न करण्याची इच्छा नाहीये. काहीही करून हे लग्न करायचे नाही यासाठी त्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. बढोसोबत मला लग्नच करायचे नाही आणि माझे लग्न तिच्यासोबत करायचा कोणी प्रयत्न केल्यास मी आत्महत्या करेन असे लकी घरातल्यांना धमकवणार आहे आणि त्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. या दृश्याचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या चित्रीकरणाच्यावेळी प्रिन्स थोडक्यात वाचला. कारण या चित्रीकरणासाठी प्रिन्सला स्वतःच्या गळ्याला खोटा फास लावायचा होता. पण प्रिन्सच्या गळ्याला खराच फास बसला. याविषयी प्रिन्स सांगतो, "या दृश्याचे चित्रीकरण करताना माझ्या पायाखाली असलेला टेबल घसरला आणि मला दोरीचा फास बसला. यामुळे मी खूपच घाबरलो. काही वेळासाठी मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. माझ्या मानेवर दोरीचे व्रणही उठले होते. काही वेळ आराम केल्यानंतर आम्ही पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर त्या दृश्याचे आम्ही चित्रीकरण पुन्हा केले. कलाकाराला त्याच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते याची मला कल्पना होती. पण चित्रीकरण करताना त्याला आपल्या प्राणाची बाजीदेखील लावावी लागते याची मला पहिल्यांदाच कल्पना आली."