उदरनिर्वाहासाठी या अभिनेत्याकडे नव्हते पैसे, विकावे लागले होते पत्नीचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 04:31 PM2020-12-25T16:31:00+5:302020-12-25T16:31:24+5:30

लग्नाच्या दहा वर्षांनंतर हा अभिनेता बाबा होणार आहे.

The actor did not have money for subsistence, he had to sell his wife's jewelery | उदरनिर्वाहासाठी या अभिनेत्याकडे नव्हते पैसे, विकावे लागले होते पत्नीचे दागिने

उदरनिर्वाहासाठी या अभिनेत्याकडे नव्हते पैसे, विकावे लागले होते पत्नीचे दागिने

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील अभिनेता मोहित मलिक आणि अदिती शिरवेकर यांच्या घरी नव्या वर्षात पाळणा हलणार आहे. लग्नाच्या दहा वर्षांनंतर दोघे आई बाबा बनणार आहेत. ही आनंदाची वार्ता त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोबतच मोहितने पत्नीसोबत फोटो शेअर केला आहे. ज्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते आहे. तर अदितीनेदेखील तिचे काही बेबी बंपचे फोटो शेअर केले आहे.

 मोहितने होणाऱ्या बाळासाठी फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, जेव्हा मी तुला हात ठेवतो तेव्हा तू आमची निवड केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. हा सुंदर आणि आनंदित करणाऱ्या अनुभवासाठी देवाचे आभार मानतो जे आम्ही अनुभवतो आहे. सर्वांसोबत हे शेअर करून खूप खूश आहे. जेव्हा आम्ही दोनचे तीन होऊ तेव्हा मला विश्वास होत आहे की आम्ही एक आहे.


मोहित मलिक छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. मात्र त्याच्या जीवनात अशी वेळ आली होती जेव्हा तो आर्थिक संकटात सापडला होता. त्याच्याकडे उदरनिर्वाहासाठीदेखील पैसे नव्हते. त्यासाठी त्याला पत्नीचे दागिने विकावे लागले होते.


काही वर्षांपूर्वी मोहितने एका मुलाखतीत आपल्या जीवनातील कठीण काळाबद्दल सांगितले होते. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, कसे संघर्षांच्या काळात त्याने दिवस काढले आणि त्याच्या पत्नीचे दागिने विकून उदरनिर्वाह केला होता.


तो म्हणाला होता की, मी आणि अदितीने 2010 साली लग्न केले. लग्नाानंतर आम्ही लोनवर घर विकत घेतले होते. मला अदितीला कम्फर्टेबल जीवन द्यायचे होते. पण यादरम्यान जवळपास दीड वर्षे मला काहीच काम मिळाले नाही. या कठीण काळात मला अदितीने खूप सपोर्ट केला होता. अदितीने घर चालवण्यासाठी आपले दागिनेदेखील विकले होते.


मोहित आणि अदितीची भेट बनू मैं तेरी दुल्हनच्या सेटवर झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर प्रेम. दोघांनी एक वर्षे एकमेकांना डेट केले आणि नंतर 1 डिसेंबर, 2010 साली लग्न केले. 

Web Title: The actor did not have money for subsistence, he had to sell his wife's jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.