अभिनेता गौरव खन्ना म्हणतोय तंदुरुस्त राहणं हे माझ्या रक्तातच आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2017 08:54 AM2017-04-17T08:54:14+5:302017-04-17T14:24:14+5:30
‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ या फॅण्टसी मालिकेत गौरव खन्नाने लढवय्या शूर राजा वीरेन्द्रची भूमिका साकारून प्रेक्षकांना चकित केले आहे.छोट्य़ा ...
‘ ्रेम या पहेली- चंद्रकांता’ या फॅण्टसी मालिकेत गौरव खन्नाने लढवय्या शूर राजा वीरेन्द्रची भूमिका साकारून प्रेक्षकांना चकित केले आहे.छोट्य़ा पडद्यावरील हा बलदंड नायक तंदुरुस्तीच्या बाबतीत काटेकोर असला, तरी त्याला सतत व्यायाम करीत राहण्याच्या भावनेने पछाडलेले नाही.हा देखणा आणि तगडा नायक सांगतो की आपल्याला तंदुरुस्त प्रकृतीचे दैवी वरदान लाभले असून तंदुरुस्त राहण्यासाठी आपण सर्व प्रकारचे अन्न खातो.“मी माझं शरीर पीळदार कसं ठेवतो, असं मला लोक कायम विचारतात. त्यावर माझं उत्तरही ठरलेलं आहे- तंदुरुस्त शरीर हे माझ्या रक्तातच आहे. मी सर्व काही खातो- अगदी गोड पदार्थांपासून तळलेल्या पदार्थांपर्यंत सर्वकाही. मी नियमित व्यायाम करतो, पण मला सतत व्यायामा करीत राहण्याची गरज आणि आवडही नाही. मी कोणतीही स्टिरिठईड किंवा विशेष पोषक अन्न सेवन करीत नाही,” असे गौरव सांगतो.सध्या बोकाळलेल्या सिक्स आणि एट पॅक्स अॅबच्या फॅडबाबत गौरवला तिटकारा आहे. तो म्हणाला, “मला अभिनेता अक्षयकुमारची विचारसरणी मान्य आहे. नैसर्गिकरीत्या स्वत:ला तंदुरुस्त आणि बलवान राखणं. माणसाने प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी केली पाहिजे. नेहमीच्या वेळी झोपणं, जेवणं, व्यायाम वगैरे. शाळा आणि कॉलेजात असताना मी अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असे. तेव्हा खेळताना घेतलेल्या श्रमांमुळे मला माझं शरीर सतत तंदुरुस्त ठेवणं जमलं आहे,असं वाटतं. आता दीर्घकाळच्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकामुळे मला फारसा वेळ उपलब्ध राहात नाही, तरी मी माझा रोजचा नियमित व्यायाम चुकवीत नाही. मी सध्या सर्किट प्रशिक्षण घेत आहे.”सध्या ‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ या फॅण्टसी मालिकेत राजा वीरेन्द्रची भूमिका साकारण्यात गुंतलेला गौरव खन्ना सांगतो की टीव्हीवरील आपल्या व्यक्तिरेखांच्या दिसण्याबाबत प्रयोग करण्यात आपण उत्सुक आहोत.“प्रेक्षकांना मी नेहमीच वेगवेगळ्य़ा रंगभूषेत दिसण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकांना तुमच्या व्यक्तिरेखेबाबत स्वारस्य निर्माण करायचे असेल, तर तुम्हाला ती व्यक्तिरेखा अगदी भिन्नपणे सादर करावी लागेल,” असे त्याने सांगितले.