कृष्णासोबत भांडणाचं नेमकं काय कारण होतं? अखेर गोविंदाने खुलासा केला; म्हणाला- "माझी बायको त्यावेळी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 17:49 IST2024-12-01T17:48:59+5:302024-12-01T17:49:25+5:30
भाचा कृष्णासोबत अबोला का होता? यामागचं कारण गोविंदाने सांगितलं. काय म्हणाला बघा (govinda, krushna abhishek)

कृष्णासोबत भांडणाचं नेमकं काय कारण होतं? अखेर गोविंदाने खुलासा केला; म्हणाला- "माझी बायको त्यावेळी..."
बॉलिवूडमधील सदैव हसतमुख चेहरा जो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतो त्याचं नाव गोविंदा. 'कुली नंबर १', 'हसीना मान जाएगी', 'भागम भाग', 'पार्टनर' अशा अनेक सिनेमांमधून गोविंदाने लोकांना खळखळून हसवलं. गोविंदाला काही दिवसांपूर्वी त्याच्या पिस्तुलातून गोळी लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता यातून सावरत गोविंदा पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात म्हणजेच कपिल शर्मा शोमध्ये दिसला. यामध्ये गोविंदाने त्याचा भाचा कृष्णा अभिषेकसोबत भांडण का झालं होतं? याचा खुलासा केला.
गोविंदाने सांगितलं नेमकं काय झालेलं?
गोविंदाने नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये एन्ट्री केली. त्यावेळी त्याने सर्वांना भाचा कृष्णासोबत नेमका काय वाद झालेला याबद्दल खुलासा केला. गोविंदा म्हणाला की,"मी एकदा कृष्णावर खूप नाराज होतो. मी त्याला विचारलं की, "हे संवाद काय आहेत जे तू इतरांकडून लिहून घेतोस." तेव्हा माझी पत्नी मला म्हणाली, "संपूर्ण फिल्म इंडस्ट्री असंच करते. तू कृष्णाला काय बोलू नको. तो त्याचं काम करतोय आणि चांगले पैसे कमावतोय."
कृष्णाला माफी मागायला गोविंदाने सांगितलं
पुढे बोलता बोलता गोविंदाने कृष्णाला सुनीताची (गोविंदाची पत्नी) माफी मागायला सांगितली. गोविंदा म्हणाला, "सुनीताची तू माफी माग. ती तुझ्यावर खूप प्रेम करते." पुढे कृष्णा म्हणाला की, "मी सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करतो. कोणत्या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो." अशाप्रकारे कपिल शर्मा शो निमित्ताने गोविंदा-कृष्णा या मामा-भाच्यामधली नाराजी कायमची मिटली. दोघांनी एकमेकांना गळाभेट दिली. दोघेही इमोशनल झालेले दिसले.