ऑनस्क्रीन आईच्याच प्रेमात पडला होता हा टीव्ही अभिनेता, ४ वर्षांचं नातं अखेर संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 09:12 AM2023-04-02T09:12:10+5:302023-04-02T09:13:48+5:30
टीव्ही अभिनेता हर्षद कुमारहून अभिनेत्री अपर्णा ७ वर्ष मोठी आहे.
टीव्ही असो किंवा फिल्म इंडस्ट्री, इथे काम करणारे कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडणं स्वाभाविकच आहे. काही कलाकार तर लग्नबंधनातही अडकले आहेत. तर काही मात्र वेगळे झाले आहेत. असंच एक कपल अभिनेता हर्षद अरोरा (Harshad Arora) आणि अभिनेत्री अपर्णा कुमार (Aparna Kumar). दोघेही एकमेकांना ४ वर्ष डेट करत होते. मात्र आता माध्यम रिपोर्टनुसार त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. दोघांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.
एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, हर्षद अरोरा आणि अपर्णा कुमार यांच्यात काही महिन्यांपासून वाद सुरु होते. जवळपास ४ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर जूनमध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. हर्षद म्हणतो, 'आमच्यात काही मतभेद होते. पण मी ते खाजगीच ठेऊ इच्छितो. आम्ही ४ वर्ष एकमेकांसोबत छान क्षण घालवले. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.'
तर अपर्णा म्हणाली, 'आम्ही लॉंग टर्म कमिटमेंटबाबत वेगवेगळे विचार करत होतो. मी त्याला शुभेच्छा देते आणि मला आशा आहे की त्याने जो निर्णय घेतला आहे त्यात तो खूश आहे. मी या रिलेशनशिपला ४ वर्ष दिले हे फारच वेदनादायक आहे. पण मी आता पुढे जातीये.'
अपर्णा हर्षदपेक्षा ७ वर्षांनी मोठी आहे. हर्षद ३२ वर्षांचा तर अपर्णा ३९ वर्षांची आहे. 'मालावी मलंग' मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. विशेष म्हणजे मालिकेत अपर्णाने हर्षदच्या आईची भूमिका साकारली होती. 2020 मध्ये दोघांनी जाहीररित्या नातं कबुल केलं होतं.