या अभिनेत्याने जाहीर केले तो ‘गे’ आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 11:06 AM2017-01-20T11:06:24+5:302017-01-20T11:06:24+5:30

भारतामध्ये खुलेपणाने समलैंगिक असणे मान्य करणे सामाजिक आणि कायद्याच्या भीतीमुळे शक्य नाही. परंतु जगभरात बदलाचे वारे वाहत असताना आपल्या ...

This actor has declared 'gay'! | या अभिनेत्याने जाहीर केले तो ‘गे’ आहे!

या अभिनेत्याने जाहीर केले तो ‘गे’ आहे!

googlenewsNext
रतामध्ये खुलेपणाने समलैंगिक असणे मान्य करणे सामाजिक आणि कायद्याच्या भीतीमुळे शक्य नाही. परंतु जगभरात बदलाचे वारे वाहत असताना आपल्या देशातही लवकरच बदल होईल असे अनेकांना वाटते. म्हणून तर महानगरांमध्ये आता समलैंगिकता किंवा होमोसेक्शुअ‍ॅलिटी किंवा ‘गे’पण कमी प्रमाणात का होईना पण भुवया न उंचावता स्वीकारले जातेय.

सध्या करण जोहरचे विस्फोटक आत्मचरित्र ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’मधील काही खुलाशांनी या विषयाभोवती वातावरण चांगलेच तापलेले आहे. करणने थेट न सांगता अप्रत्यक्षरीत्या त्याचा लैंगिक कल काय आहे हे सूचित केले आहे. त्याच्या अशा हिंमतीची एकीकडे वाहवाह होत असताना अनेक समलैंगिक कम्युनिटींनी त्याने उघडपणे ‘गे’ असल्याचे मान्य न केल्यामुळे त्याच्यावर टीका सुरू केली आहे.

आता करणने जरी थेट मान्य केले नसले तरी त्याने इतरांना नक्कीच प्रेरित केल्याचे दिसते. आशुतोष गोवारिकर निर्मित ‘एव्हरेस्ट’ या टीव्ही मालिकेतून झळकलेला अभिनेता सात्विक यांने ब्लॉगवर एक पत्र लिहून जाहीर केले की, ‘मी गे आहे!’ स्वत:ची समलैंगिकता स्वीकारून जगण्याचा त्याचा अनुभव कसा होता, हे त्याने या भावनिक पत्रात सांगितले आहे.

ALSO READ: डियर करण, तू चुकीचा संदेश देतो आहेस

तो लिहितो, ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’मधील करण जोहरच्या खुलाशांची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. ‘मी गे आहे’ असे थेट न सांगता त्याने त्याचा समलैंगिकपणा जाहीर केला. एका दृष्टीने त्याने असे मान्य करणे आपल्या देशात खूप मोठी गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर असे दिसते की, त्याच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसालासुद्धा ‘समलैंगिक’ म्हणून उघडपणे मान्य करणे सोपी गोष्ट नाही. देशात मानवधिकारांची काय दुर्दशा आहे हे यावरून दिसते. आता त्याने ‘मी गे आहे’ असे का म्हटले नाही यावर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला त्याची मनस्थिती काय याची काहीच कल्पना नसल्यामुळे त्याच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. मी त्याला काही सल्ला देण्याची गरज नाही.’

‘ पण एक गोष्ट आहे की, त्याने मला प्रेरणा दिली आहे. आज मी सर्वांना मुक्तपणे सांगतो की ‘मी गे आहे’. वयाच्या विसाव्या वर्षीच मी माझ्या आईवडिलांना याबाबत सांगितले होते आणि त्यांनी मोठ्या मनाने माझा स्वीकार केला होता. पुढे आॅक्सफोर्डला शिकायला गेल्यावर तर मला खूप चांगला अनुभव आला. तेथे लोकांना तुमच्या लैंगिकतेशी काही देणे-घेणे नाही. तुम्ही ‘गे’ असल्याचे सांगितले तर ते नाक मुरडत नाहीत. मी तेथे माझ्या नैसर्गिक लैंगिकतेचा स्वीकार करून मुक्त जीवन जगू शकलो. त्यामुळे मी सर्वांसमक्ष मान्य करू शकतो की, मी गे आहे.

ALSO READ: करण जोहरचा आत्मचरित्रात ‘गे’ असल्याचा खुलासा

Web Title: This actor has declared 'gay'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.