एकेकाळी दारुच्या आहारी गेला होता प्रसिद्ध मराठी अभिनेता; करिअरही लागलं होतं दावणीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 14:51 IST2023-06-14T14:50:56+5:302023-06-14T14:51:28+5:30
kiran mane: दारुच्या व्यसनामुळे त्यांचा अभिनयदेखील मागे पडत चालला होता.

एकेकाळी दारुच्या आहारी गेला होता प्रसिद्ध मराठी अभिनेता; करिअरही लागलं होतं दावणीला
उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने (kiran mane). कलाविश्वासह समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर ते उघडपणे व्यक्त होत असतात. इतकंच नाही तर ते बऱ्याचदा त्यांच्या जीवनात घडणारे किस्से, गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करतात. यावेळी त्यांनी त्यांना जडलेल्या दारुच्या व्यसनाविषयी भाष्य केलं आहे.
किरण माने यांनी अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांना कशाप्रकारे दारुचं व्यसन लागलं, ते व्यसन कसं सोडवलं आणि अभिनयाची वाट धरली हे सांगितलं.
काय आहे किरण माने यांची पोस्ट?
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी ही पोस्ट वाचून अनेक फोन्स आलेवते मला, "सर, मी ही अभिनेता आहे. दारूपायी माझा संसार,करीयर सगळं उध्वस्त झालंय. एकेकाळी अभिनयाची अनेक पारितोषिकं घेतलीत. तुमची पोस्ट वाचली. मला तुमच्यासारखंच व्यसनमुक्त व्हायचंय. काय करू???" एक रत्नागिरीचा आणि एक इचलकरंजीचा असे दोघेजण व्यसनमुक्त झालेही ! वरचेवर नवनविन फॉलोअर्सनी वाचावी यासाठी #रिपोस्ट करत रहाणं गरजेचं वाटतं मला. असं म्हणत किरण माने यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.