आत्माराम तुकाराम भिडे 'तारक मेहता का उलटा चष्मा' सोडणार? अभिनेता खुलासा करत म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:45 AM2024-08-28T11:45:03+5:302024-08-28T11:45:53+5:30

मंदार चांदवडकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन तो तारक मेहता का उलटा चष्मा शो सोडणार की नाही याविषयी खुलासा केलाय.

actor mandar chandwadkar exit from tarak mehta ka ooltah chashmah serial fact check | आत्माराम तुकाराम भिडे 'तारक मेहता का उलटा चष्मा' सोडणार? अभिनेता खुलासा करत म्हणाला-

आत्माराम तुकाराम भिडे 'तारक मेहता का उलटा चष्मा' सोडणार? अभिनेता खुलासा करत म्हणाला-

गेली १४ हून जास्त वर्ष तारक मेहता का उलटा चष्मा मालिका सुरु आहे. ही मालिका गेली १४ वर्ष अविरतपणे प्रेक्षकांना खळखळून हसवतेय. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालंय. जेठालाल, दयाभाभी, मेहता साब, बापूजी, टप्पू असे अनेक कॅरेक्टर्स प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. तारक मेहता का उलटा चष्मामधील असंच एक लोकप्रिय कॅरेक्टर म्हणजे आत्माराम तुकाराम भिडे. मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. पण अशातच मंदार हा शो सोडणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, याचा खुलासा स्वतः मंदारने केलाय. 

मंदार 'तारक मेहता..' सोडणार असल्याची बातमी का पसरली?

झालं असं की युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओच्या थंबनेलवरील फोटोंवर मंदारचा फोटो लावण्यात आलाय. या फोटोवर मंदारचा हात जोडलेला फोटो शेअर करण्यात आलाय. मेकर्सचा पर्दाफाश करेल असा संवाद या फोटोवर दिसत असून मंदार तारक मेहत... सोडणार असंही सांगण्यात आलंय. परंतु हा व्हिडीओ आणि त्यावरील फोटो हा दिशाहीन करणारा असून मंदार तारक मेहता.. सोडणार नाही, असा खुलासा त्याने केलाय.

मंदार तारक मेहता.. शो सोडण्याबद्दल काय म्हणाला?

मंदार चांदवडकरने सोशल मीडियावर याविषयी व्हिडीओ शेअर करुन खुलासा केलाय की, "मी तारक मेहता हा उलटा चष्मा सोडून जाणं ही एक निव्वळ अफवा आहे. लोक सोशल मीडियाचा खूप चुकीच्या पद्धतीने उपयोग करतात हे बघून वाईट वाटतं. या व्हिडीओवरील फोटो जेव्हा काही वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे ही निव्वळ अफवा आहे. २००८ पासून मी तुमचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे पुढेही असंच होईल यात शंका नाही." 

 

Web Title: actor mandar chandwadkar exit from tarak mehta ka ooltah chashmah serial fact check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.