माझ्यासाठी प्रार्थना करा..., मराठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट; वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 13:04 IST2021-08-25T12:59:14+5:302021-08-25T13:04:50+5:30

तुमच्या प्रार्थनेने काही जादू नक्कीच घडेल..., असे म्हणत तिने एक इमोशनल इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.

actor mihir rajda wife actress niilam panchal rajda emotional post | माझ्यासाठी प्रार्थना करा..., मराठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट; वाचा काय आहे कारण

माझ्यासाठी प्रार्थना करा..., मराठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट; वाचा काय आहे कारण

ठळक मुद्देनीलमचा पती मिहिर सध्या सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरची ‘वैजू नं 1’ ही मालिका आठवत असेल तर या मालिकेतील एक गुजराती जोडपंही तुम्हाला आठवत असेल. आता ही मालिका संपली असली तरी या गुजराती जोडप्याला विसरता येणं शक्य नाही. अभिनेता मिहिर राजदा (Mihir Rajda) आणि त्याची पत्नी अभिनेत्री नीलम पांचाळ (Niilam Paanchal) या दोघांनी या गुजराती जोडप्याची भूमिका साकारली होती.

ख-या आयुष्यात पती पत्नी असलेल्या नीलम व मिहिरची ही  एकत्र अशी पहिलीच मराठी मालिका होती.  मिहिरची पत्नी नीलम पांचाळ हिने गुजराती चित्रपट, हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. हीच नीलम सध्या एका अज्ञात आजारामुळे बेजार झाली आहे.  एक भावनिक पोस्ट शेअर करून तिने चाहत्यांना माझ्यासाठी प्रार्थना करा असे म्हटले आहे.


 
या भावनिक पोस्ट सोबत नीलमने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या संपूर्ण शरीरावर असे फोड आल्याचे म्हटले आहे. ती लिहिते, ‘ हे काय आहे मला माहित नाही. पण हे बहुतेक फूड अ‍ॅलर्जी असावी किंवा आणखी काही. हे खूपच वाईट दिसत आहे. मी सध्या एका छोट्याशा शहरात शूटिंगसाठी आले आहे जिथे मला औषधं मिळणं कठीण आहे. काही वेळापूर्वीच मला औषधं मिळाली आहेत आणि ती काम करतील, अशी आशा आहे.  परंतु तरीदेखील तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. कारण हे सर्व माझ्या शरीरभर पसरले आहेत आणि ते असह्य आहे. तुमच्या प्रार्थनेने काही जादू नक्कीच घडेल.’

तिच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी ती लवकर बरी व्हावी, म्हणून प्रार्थना केली आहे. नीलमचा पती मिहिर सध्या सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे. ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेतून मिहिरने आनंदची भूमिका साकारली होती.  

Web Title: actor mihir rajda wife actress niilam panchal rajda emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.