बिनधास्त बाईक चालवते, व्यायाम करते अन् बरंच काही..; मिलिंद गवळींच्या लेकीचा थक्क करणारा व्हिडीओ बघाच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 02:14 PM2024-06-03T14:14:40+5:302024-06-03T14:15:16+5:30
मिलिंद गवळींच्या लेकीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद गवळींनी शेअर केलेला खास व्हिडीओ चर्चेत आहे (milind gawali, aai kuthe kay karte)
'आई कुठे काय करते' मधील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट शेअर करत असतात. मिलिंद गवळी यांची लेक मिथिलाचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने मिलिंद यांनी लेकीचा खास व्हिडीओ शेअर केलाय. यात मिलिंद यांच्या लेकीचा बिनधास्त अंदाज बघायला मिळतोय. मिलिंद यांची लेक एकदम फिट अँड फाईन दिसते. मिलिंद यांच्या लेकीचा हा भन्नाट अंदाज पाहून सर्वांनाच एक सुखद धक्का बसलाय.
मिलिंद लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहितात, "मिथिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज ३ जून आमच्या बाळाचा वाढदिवस.
असं म्हणतात , मागच्या जन्मी जर खूप पुण्य केलं असेल तरच या जन्मी तुम्हाला एका मुलीचा वडील होण्याचं भाग्य लाभतं, आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला मेथीला सारखी लेक आहे, आजकालच्या आई-वडिलांना त्यांच्या मुलांविषयी तक्रार करताना मी ऐकतो किंवा मुलांमुळे त्रासलेले पालक मी पाहतो तेव्हा खरंच मी आणि दिपा स्वतःला
खूप भाग्य समजतो, कारण मिथिला सारखी अती समंजस मुलगी आम्हाला मिळाली."
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "अगदी लहानपणापासूनच मिथिला खूपच प्रेमळ,समंजस आणि मायाळू, तिला वाढवताना आम्हाला तीळमात्र सुद्धा कधी काही त्रास झाला नाही, कुठल्याही गोष्टीचा हट्ट करणे हे तिला माहीतच नव्हतं, आईबापाच्या परिस्थितीची सतत जाणीव, त्यामुळे जे आपल्या वाटेला येईल ते अगदी समाधानाने स्वीकारायचं, content आणि Gratitude काय असतं हे तर तिच्याकडूनच शिकायला हवं, कुठलीही गोष्ट ती कष्ट करूनच मिळवायची, त्यासाठी खूप मेहनत घ्यायची, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न करायचे , ही एक गुरुकिल्लीच तिला सापडली आहे, लहानपणी सामान्य मुलींन सारखी, शाळेत माझ्यासारखेच सामान्य मार्क मिळवणारी, अचानक गोडसे सरांसारखे शिक्षक, गुरु तिला लाभले, आणि तिच्या आयुष्याचं paradigm shift झालं, असामान्य intelligent, talented आणि consistency and hard work तिच्यात भिनलं. जिंकण्याची वृत्ती तयार झाली, आयुष्यात अशक्य असं काही नसतं हे तिला जाणवायला लागलं."
मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "चौथीमध्ये Primary Princess स्पर्धेत भाग घेतला असताना, एका शिक्षिकेने तिला सांगितलं “मागे जाऊन उभी राहा, तू काही या स्पर्धेत जिंकू शकणार नाहीस” पण मिथिला खचून न जाता त्यावर्षी संपूर्ण शाळेमध्ये प्रायमरी प्रिन्सेस चं प्रथम पारितोषिक तिने मिळवलं. एक वडील म्हणून मला सातत्याने मिथिलाचा अभिमान वाटत आला आहे, normally वडील आपल्या मुलांना शिकवतात , तिच्या शाळेतले काही वर्ष सोडले तर आयुष्यभर मी तिच्याकडून च शिकत आलो आहे,
physically Strong असणं गरजेचं आहे पण त्याच बरोबर Mentally strong पण असणं आवश्यकचं आहे हे तिच्या कडून मी शिकलो. कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्याला सामोरे जायचं, आणि त्यातून च मार्ग काढायचा. आम्ही दोघेही मोठी स्वप्न पाहतो, फक्त आमच्यात फरक एवढाच आहे, ती ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतोनात कष्ट मेहनत घेत असते. आज तिचा वाढदिवस आहे या निमित्ताने तिला भरभरून आशीर्वाद, खूप यश, आनंद, समृद्धी, आरोग्य, सगळ्या इच्छा,आकांक्षा, पूर्ण होऊ देत ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्या प्रामाणिक कष्टाने तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार ही मला खात्री आहे."