'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता झाला बाबा, चाहत्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 09:35 AM2024-06-03T09:35:22+5:302024-06-03T09:36:12+5:30

येऊ कशी तशी मी नांंदायला फेम लोकप्रिय अभिनेता बाबा झाला असून कलाकारांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय (nikhil raut)

actor nikhil raut become a father blessed with baby boy | 'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता झाला बाबा, चाहत्यांकडून अभिनंदन

'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता झाला बाबा, चाहत्यांकडून अभिनंदन

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील अभिनेता निखिल राऊत बाबा झालाय. निखिलने सोशल मीडियावर फोटो शेअर करत तो बाबा झाल्याची गुड न्यूज सर्वांना सांगितलीय. निखिल राऊतने सोशल मीडियावर पत्नी आणि बाळाचे फोटो सर्वांना दाखवले आहेत. त्याने बाळाचा चेहरा मात्र लपवला आहे. ही गुड न्यूज कळताच निखिलच्या चाहत्यांनी कमेंटमध्ये त्याचं अभिनंदन केलंय.

निखिलने सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

"आमच्या लाडक्या मुलाच्या जन्माची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे, 27 मे 2024 ला त्याचा जन्म झाला.  आमच्या बाळाला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम द्या. आम्ही सूर्या हॉस्पिटल सांताक्रूझ पश्चिम येथील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांचे आणि विशेषत: डॉ. अमीत पत्की सरांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो, ज्यांच्या कौशल्याने आणि अथक प्रयत्नांमुळे हा आनंदाचा प्रसंग शक्य झाला. श्री स्वामी समर्थ" अशी पोस्ट करुन निखिलने हा आनंद व्यक्त केलाय. 

निखिल राऊतचं वर्कफ्रंट

निखिल राऊतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर.. निखिलला आपण काहे दिया परदेस, येऊ कशी तशी मी नांदायला अशा मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. याशिवाय निखिलने फर्जंद, फत्तेशिकस्त, बंपर लॉटरी अशा सिनेमांमध्ये अभिनय केलाय. निखिलने रंगभूमीवर सुरक्षित अंतर ठेवा, शेवग्याच्या शेंगा अशा नाटकांमध्ये काम केलंय. दरम्यान बाबा झाल्याबद्दल अनेकांनी निखिलचं कमेंटमध्ये अभिनंदन केलंय.

Web Title: actor nikhil raut become a father blessed with baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.