भावनिक राहुलची 'ही' कहाणी तुमच्या अंगावरही आणेल काटा, वाचून येईल तुमच्याही डोळ्यात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:04 PM2020-05-23T16:04:04+5:302020-05-23T16:05:03+5:30
प्रत्येक फौजी पुत्राची हीच अवस्था असते. हाच विचार त्या मुलाला पाहून राहुल्याच्या डोक्यात आला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
'लागीर झालं जी' मालिकेने छोट्या पडद्यावर तुफान हिट ठरली होती. या मालिकेत राहुल्या साकारणारा राहुल मकदुमने रसिकांचे तुफान मनोरंजन केले होते. राहुल या मालिकेमुळे ख-या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. आर्मीत गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची काय अवस्था असते याची राहुल्याला जाणीव असून त्याने ती गोष्ट रिअल लाइफमध्ये अनुभवली आहे. कारण राहुल्याचे वडिल हेसुद्धा आर्मीत होते. वडील आर्मीत असल्याने बालपणी राहुल्याची काय अवस्था झाली असेल, हा किस्सा सोशल मीडियावर त्याने सांगितला होता.
https://www.facebook.com/photo.php?fbid=669269456589535&set=a.124904157692737&type=3
त्याने एक व्हिडीओ पाहिला होता त्यात एक लहान मुलगाही होता. खरं तर त्यालाच पाहून राहुल्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. तो मुलगा एका फौजीचा मुलगा होता. त्याला पाहून राहुल्याच्या डोळ्यासमोर स्वतःचं बालपण आलं. या मुलाची काय अवस्था असेल याच विचाराने राहुल्याल अश्रू अनावर झाले. सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचं आणि सा-या भारतीयांचे फौजी रक्षण करत असतात. त्यांच्या त्यागामुळेच आपण आपलं जीवन आपल्या लाडक्या आईवडिलांसह जगत असतो. मात्र फौजीचा लेक बालपणी आपल्या वडिलांच्या प्रेमाला मुकतो.
प्रत्येक फौजी पुत्राची हीच अवस्था असते. हाच विचार त्या मुलाला पाहून राहुल्याच्या डोक्यात आला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या वडिलांची आठवण, बालपणी होणारी मनाची घालमेल सारं त्यांच्या डोळ्यासमोर आलं. मात्र वडिलांविना त्यांची मुलं कशी जगत असतील हा विचार राहुल्याला अस्वस्थ करुन गेला. त्यामुळे सा-यांना हसवणा-या राहुल्याचा भावनिक चेहरा पाहायला मिळाला.