'खरंच तिचं काय चुकलं?' मालिकेत रोशन विचारेची एन्ट्री, दिसणार प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 05:37 PM2023-10-13T17:37:58+5:302023-10-13T17:38:07+5:30

Roshan Vichare : रोशनने आजपर्यंत साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेतील त्याची भूमिका काहीशी वेगळी आहे.

Actor Roshan Vichare's entry in the series 'Kharach Ticha Kay Chukala?', will be seen in the lead role | 'खरंच तिचं काय चुकलं?' मालिकेत रोशन विचारेची एन्ट्री, दिसणार प्रमुख भूमिकेत

'खरंच तिचं काय चुकलं?' मालिकेत रोशन विचारेची एन्ट्री, दिसणार प्रमुख भूमिकेत

नाटक-मालिका आणि चित्रपटातून  प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता रोशन विचारे 'खरंच तिचं काय चुकलं?' या सोनी मराठीवरील रहस्यमय मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रोशनने आजपर्यंत साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेतील त्याची भूमिका काहीशी वेगळी आहे. श्रेयस अग्निहोत्री... गडगंज श्रीमंत होतकरू तरुण... आभा निवासचा एकुलता एक वारस, अशी ख्याती असणारी ही व्यक्तिरेखा रोशन आपल्या अभिनयातून उत्तमरीत्या साकारतो आहे.

अग्निहोत्रींच्या घरची सून आभाच व्हायला हवी, अशी तिच्या आईची इच्छा आहे. आभा निवासची खरी मालकीण आभाच आहे, हे वेळोवेळी अधोरेखितही केले गेले आहे. पण श्रेयसच्या मनाची मालकीण कोण आहे.. आभा की कुहू..? हे एक कोडंच आहे. आभा निवासशी आभाचा काय संबंध आहे, याचं रहस्य अजूनही उलगडलेलं नसताना आभा आणि कुहू या दोन बहिणींच्या आयुष्यात झालेला श्रेयसचा प्रवेश आणखी पेच वाढवणारा ठरणार आहे. 

श्रेयसच्या येण्यानी 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत प्रेमाचे रंग भरले जाणार हे निश्चित. मालिकेत प्रसंगागणिक सातत्याने गडद होत जाणाऱ्या छटांमध्ये अग्निहोत्रीच्या भूमिकेत रोशन श्रेयस काय रंग भरतो, हे बघणं आता रंजक ठरेल. अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सोनी मराठीवरील 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेत रोज एका रहस्याचा डाव मांडला जातोय. त्यातले काही छुपे गूढ पत्ते एक-एक करून आपल्या मनाचा ठाव घेणार आहेत.
 

Web Title: Actor Roshan Vichare's entry in the series 'Kharach Ticha Kay Chukala?', will be seen in the lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.