"दीड दीड पानांचं स्क्रिप्ट अक्षरशः....", प्राजक्ता माळीसाठी समीर चौगुलेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 04:31 PM2022-08-08T16:31:19+5:302022-08-08T16:34:00+5:30

हास्यजत्रा फेम समीर चौगुलेंनी प्राजक्ता माळीसाठी लिहिलेली खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

Actor Samir Choughule write special post for Prajakta Mali | "दीड दीड पानांचं स्क्रिप्ट अक्षरशः....", प्राजक्ता माळीसाठी समीर चौगुलेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

"दीड दीड पानांचं स्क्रिप्ट अक्षरशः....", प्राजक्ता माळीसाठी समीर चौगुलेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मालिकांपासून कारकीर्दीची सुरुवात करणारी प्राजक्ता सध्याच्या घडीला बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. प्राजक्ताची रानबाजार वेबसीरिज चांगलीच गाजली. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.चाहत्यांची लाडकी प्राजू अर्थात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस. 

मी मूळची पुण्याची. ललित कला केंद्रात मी नृत्य विषयात एमए करत होते. त्यावेळी योगायोगाने डान्स ग्रुपमधील एका मुलाने मला पाहिलं आणि ‘तांदळा’ सिनेमात मला अगदी छोटीशी भूमिका मिळाली. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेनेनंतर प्राजक्ता माळी हे नाव घराघरात पोहोचले. मालिकेतील अभिनेता ललित प्रभाकरसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. आज प्राजक्ता 34 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्तानेहास्यजत्रा फेम समीर चौगुलेंनी तिच्याबाबत एक खास पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

समीर चौघुले यांची पोस्ट
Happy birthday to the real and pure friend Prajakta Real ... माझ्या "वा दादा वा"च्या जागतिक हक्कांची मालकीण...अत्यंत लाघवी आणि ever energetic मुलगी...दीड दीड पानांचं स्क्रिप्ट अक्षरशः १५ मिनिटात पाठ करून अत्यंत सहज सुलभ पद्धतीने सादर करणे ही तिला मिळालेली दैवी देणगी आहे. प्राजू you are very special to me..and you know that.....wish you a very happy birthday.....


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राजक्ता माळी करत आहे. त्यामुळे तिचं समीर चौगुलेंसोबत फारच छान बॉन्डिंग आहे.

Web Title: Actor Samir Choughule write special post for Prajakta Mali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.