Sankarshan Karhade: नाटक पाहिल्यावर प्रेक्षक जेव्हा संकर्षण कऱ्हाडेला खाऊसाठी ५०० रुपये देतात, अभिनेता गहिवरला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 02:24 PM2023-02-27T14:24:16+5:302023-02-27T14:26:46+5:30
Sankarshan Karhade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने तू म्हणशील तसं या त्याच्या नाटकादरम्यानची अतिशय बोलकी सोशल मीडियावर लिहिली आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून नाव कमावणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). आपल्या कलागुणांमुळे संकर्षण अल्पावधीत लोकप्रिय झाला. त्यामुळे आज त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. संकर्षण सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. त्याने एखादी पोस्ट शेअर केली रे केली की ती व्हायरल झालीच समजा. संकर्षणच्या नव्या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
संकर्षण मराठी नाटकांच्या प्रयोगादरम्यान विविध अनुभव येतात. ते संकर्षण चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असतो. आता त्याने तू म्हणशील तसं या नाटकादरम्यान एक वेगळा अनुभव शेअर केला आहे. नाटकला आलेल्या रसिकांनी संकर्षणला चक्क खाऊसाठी ५०० रुपये दिले.
याबाबत लिहिताना संकर्षणने लिहितो, म्हणुन “रसिक प्रेक्षक माय बाप आहेत..” आज #तूम्हणशीलतसं चा ३०० वा प्रयोग पार पडला.. प्रयोगानंतर एक काका काकु आले मला म्हणाले, “आम्ही , अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे , प्रशांत दामले ह्या सगळ्यांची नाटकं पाहात आलोय.. त्यांची कामं पाहातांना सकारात्मक उर्जा जाणवायची , जाणवते.. तीच उर्जा तुझ्या कामांत आणि प्रेजेन्स मध्ये आहे.. ति टिकवून ठेव.. आणि खाउ साठी हे ५०० रूपये घे..”मी घेत नव्हतो.. पण त्यांचा आग्रह मी मोडला नाही.. आई बाबा खाउ साठी पैसे देतात , तसेच ४०० रुपयांचं तिकिट काढून परत वेगळे खाउ चे ५०० रुपये द्यावे वाटणं ही फार मोठी गोष्टं आहे.…सोबतच मोठ्या मनाने दिलेली दाद आहेच.. म्हणुन तुम्ही “माय बापच” आहात..
संकर्षणच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. एका यूजरने लिहिले, हे पाचशे रुपये कोण्या पुरस्कारा पेक्षा कमी नाहीत. संकर्षणजी तुम्हाला खुप खुप सुभेच्छा. दुसऱ्या एकाने लिहिले, संकर्षण सर..... तुमच्या कामातुन, वागण्यातून, लिखाणातून ते वेळोवेळी दिसते....👏👏 परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आणि यश देवो. आणखी एकाने लिहिले, खूप छान सकर्षण, अभिनंदन कौतुक.
चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.