"प्रिय संकेत आणि सुपर्णा..", ऑनस्क्रिन मुलाच्या लग्नाचा फोटो शेअर करत निवेदिता सराफ झाल्या भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 13:49 IST2023-04-24T12:57:46+5:302023-04-24T13:49:13+5:30

पुण्यात थाटात लग्न पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी ही हजेरी लावली होती.

Actor sanket pathak suparna shyam wedding nivedita saraf emotional post on instagram | "प्रिय संकेत आणि सुपर्णा..", ऑनस्क्रिन मुलाच्या लग्नाचा फोटो शेअर करत निवेदिता सराफ झाल्या भावूक

"प्रिय संकेत आणि सुपर्णा..", ऑनस्क्रिन मुलाच्या लग्नाचा फोटो शेअर करत निवेदिता सराफ झाल्या भावूक

लग्नाची बेडी फेम राघव म्हणजेच अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम यांचा मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या दोघांनी लग्नगाठ बांधली. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सोशल मीडियावर या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.  मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. 

  पुण्यात थाटात लग्न पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी ही हजेरी लावली होती. आता निवेदिता यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत नवदाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“माझे प्रिय संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम लग्नबंधनात अडकले. माझ्यासाठी हा खरंच खूप भावनिक क्षण होता. तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वाद”, असे निवेदिता सराफ यांनी म्हटले.‘दुहेरी’ या मालिकेत या तिघांनी एकत्र काम केले होते. त्यांची ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत निवेदिता यांनी संकेतच्या आईची भूमिका करत होत्या. त्यामुळे त्यांच्यात एक वेगळेचं नातं निर्माण झालं होतं.

संकेत आणि सुपर्णाने एकमेकांना कधीही ऑफिशियली प्रपोज केले नव्हते. पण डिसेंबर महिन्यात सुपर्णाने संकेतच्या मावस बहिणीच्या लग्नात त्याला सरप्राईज देऊन प्रपोज केले होते. यावेळी संकेतच्या कुटुंबीयांनी सुपर्णाला पाठिंबा दर्शवला होता. सगळ्या नातेवाईकांनी या गोष्टीपासून संकेतला अनभिज्ञ ठेवले होते. ही सगळी अरेंजमेंट करण्यासाठी त्याचे काका त्याला बाहेर घेऊन गेले होते.

सगळी अरेंजमेंट झालीये असे कळताच काका त्याला घरी घेऊन आले. संकेतने दार उघडताच भयाण शांतता दिसली तेवढ्यात समोर गॅलरीत नटून थटून उभ्या असलेल्या सुपर्णाकडे त्याचे लक्ष वेधले. सगळ्यांच्या समोर सुपर्णाने संकेतला सिनेस्टाईलने प्रपोज केलेले पाहून त्यांचे चाहते सुद्धा अवाक झाले. हा व्हिडीओ सुपर्णा आणि संकेतने सोशल मीडियावर शेअर करताच ‘ हे कधी घडलं?’ अशा प्रतिक्रिया त्यांना मिळू लागल्या होत्या.

Web Title: Actor sanket pathak suparna shyam wedding nivedita saraf emotional post on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.