मराठीतील 'हा' प्रसिद्ध अभिनेता बनला बाबा, IT'S A BOY म्हणत शेअर केली गुड न्यूज !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 12:18 PM2021-03-10T12:18:02+5:302021-03-10T12:22:46+5:30
मालिका, चित्रपट आणि नाटक या तिनही माध्यमांमध्ये त्याने काम केले आहे.
शशांक केतकर, आरोह वेलणकरनंतर आणखी एका मराठी अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेता श्रीकर पित्रे बाबा झाला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत त्याने ही गोड बातमी दिली आहे. श्रीकरला मुलगा झाला आहे. आम्हाला मुलगा झाला आहे. आम्हाला आमच्या बाळाचं स्वागत करताना आनंद होतो आहे जो आम्हाला मदर्स डे आणि फादर्स डेच्या शुभेच्छा देईल. असे कॅप्शन त्याने पोस्ट दिले आहे. श्रीकरच्या चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर श्रीकर बराच सक्रिय असतो. आपले वर्क आऊट, फॅमिलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तो शेअर करत असतो.
श्रीकरने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिनही माध्यमांमध्ये काम केले आहे. . त्याने काही बालनाट्यांमध्येही काम केलं आहे. ‘जंबा बंबा बू’ हे त्याचं बालनाट्य बरंच चर्चेत आहे. ‘ती फुलराणी’, ‘लव लग्न लोचा’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ अशा काही मराठी मालिकांमध्ये देखील श्रीकरने अभिनय केला आहे. ‘चुभन’, ‘इश्क वाला लव्ह’ अशा काही चित्रपटांमध्येही तो झळकला होता.