Siddharth Jadhav : आपला सिध्दू मोडणार स्वत:चाच रेकॉर्ड! ४०० कलाकारांसोबत घालणार धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 07:00 AM2023-03-09T07:00:00+5:302023-03-09T07:00:06+5:30

आतापर्यंतच्या करिअरमध्ये सिद्धार्थने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हीट चित्रपट दिले आहेत. आता सिध्दू स्वत:चाच रेकॉर्ड मोडणार आहे.

Actor Siddharth Jadhav will break his own record! he will perform with 400 artists | Siddharth Jadhav : आपला सिध्दू मोडणार स्वत:चाच रेकॉर्ड! ४०० कलाकारांसोबत घालणार धिंगाणा

Siddharth Jadhav : आपला सिध्दू मोडणार स्वत:चाच रेकॉर्ड! ४०० कलाकारांसोबत घालणार धिंगाणा

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) स्वत: ची एक वेगळी आणि खास ओळख नक्कीच निर्माण केलीये. आतापर्यंतच्या करिअरमध्ये  सिद्धार्थने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हीट चित्रपट दिले आहेत. सिद्धार्थच्या अभिनयाने चित्रपट  फक्त खास होत नाहीत तर धमाकेदार कमाई देखील करतात. सिद्धार्थ आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसवतो. प्रेक्षक  सिद्धार्थच्या चित्रपटांवर प्रेम करतात. अर्थात इथपर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. यासाठी सिद्धार्थने बराच मोठा स्ट्रगल  केला.

सिद्धार्थ जाधवच्या खुमासदार सूत्रसंचलनाने आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रम महाराष्ट्राचा नंबर वन कथाबाह्य कार्यक्रम बनला. स्टार प्रवाह परिवारातल्या सर्वच सदस्यांसोबत सिद्धार्थने आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर धिंगाणा घातलाय. मात्र स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थ स्वत:चाच रेकॉर्ड मोडणार आहे. या सोहळ्यात तब्ब्ल ४०० कलाकारांसोबत धमाल टास्क खेळत सिद्धार्थ महाधिंगाणा घालणार आहे.

विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना भरभरुन हसायला लावण्यात त्याचा हातखंड आहे. त्यामुळे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थचा ४०० कलाकारांसोबतचा हा महाधिंगाणा नवा विक्रम ठरणार आहे. खास बात म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात आता होऊ दे या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ जाधवला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालकाचा पुरस्कारही मिळणार आहे.

Web Title: Actor Siddharth Jadhav will break his own record! he will perform with 400 artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.