"मला आईने फोन केला.." एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबरोबर झालेल्या साखरपुड्याच्या अफवांवर पहिल्यांदा बोलल सुयश टिळक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 02:25 PM2023-04-14T14:25:54+5:302023-04-14T15:51:41+5:30
एका मुलाखतीत सुयशला त्याच्या अक्षयासोबत साखरपुड्याबद्दल उडालेल्या अफवांबद्दल विचारण्यात आले. यावर त्याने पहिल्यांदाच भाष्य केलं.
मराठी कलाविश्वात अनेक अभिनेता अभिनेत्री आहेत जे शूटिंग दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. किंवा एखाद्या पार्टीत त्यांची ओळख झाली आणि मग नात्यात आलं. यापैकीच एक जोडी होती ती अभिनेता सुयश टिळक आणि अक्षया देवधरची. सुयश आणि अक्षयाने काही काळ एकमेकांना डेट केलं आणि नंतर त्यांचं ब्रेकअप झालं आणि दोघेही आयुष्यात पुढे निघून गेले. अलिकडेच सुयशने अक्षयासोबतच्या ब्रेकअपवर भाष्य केलं आहे.
प्लॅनेट मराठीला सुयश टिळकने एका मुलाखत दिली आहे जी सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीदरम्यान सुयशने त्याच्या खासगी आयुष्याला घेऊन विचारलेल्या अनेक प्रश्नांची मोकळेपणे उत्तर दिली आहेत. यावेळी सुयशला त्याच्या अक्षयासोबत साखरपुड्याबद्दल उडालेल्या अफवांबद्दल विचारण्यात आले.
सुयश म्हणाला, माझं आणि अक्षयाचं नातं मीडियाने चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडलं. आमचा साखरपुडा झालाय ही बातमी ऐकून आम्हालाच धक्का बसला होता. आपण साखरपुडा कधी केला, असा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला होता.
त्यावेळी एका ज्वेलर्ससोबत टायअप अक्षयाबरोबर झालं होतं. आम्ही दोघांनीही एक अंगठी घातली होती. तिने तो फोटो पोस्ट केला होता आणि त्यात ती अंगठी हातात दिसत होती. त्यामुळे लोकांना असं वाटलं की आम्ही साखरपुडा केलाय. असं स्पष्टीकरण सुयशने दिलं.
“माझ्या घरचे खूप साधी माणसं आहेत. त्यांना या ग्लॅमरशी काहीही घेण-देण नाही. जेव्हा त्यांना हे सर्व समजलं तेव्हा मला आईने फोन केला. त्यावेळी आईला म्हटलं, अगं तुला नाही सांगणार का? तेव्हा काहीही घडत होतं.
काहीही लिहिलं जातं होतं, काहीही वाचायला मिळत होतं, पण मी त्यावेळी या सर्व प्रकरणावर शांत राहायचं असं ठरवलं होतं. कारण मला कोणचाही अनादर त्यावेळी करायचा नव्हता. मला तेव्हा अक्षयाचाही अनादर करायचा नव्हता. मी तेव्हा शांत राहिलो, त्याचे वेगळे अंदाज लावण्यात आले”, असेही सुयश टिळकने म्हटले.
दरम्यान सुयश टिळक आणि अक्षया देवधरचं ब्रेकअप झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले होते. सुयशने अभिनेत्री आयुषी भावे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. दोघांचा सुखाचा संसार सुरु आहे. तर अक्षया देवधरने अभिनेता हार्दिक जोशीबरोबर लग्न केलं आहे.