मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे ही अभिनेत्री; वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल आउटफिटमध्ये दिसते लय भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 07:00 IST2021-12-05T07:00:00+5:302021-12-05T07:00:01+5:30
आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते.

मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे ही अभिनेत्री; वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल आउटफिटमध्ये दिसते लय भारी!
लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना आयुषी भावे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. तिच्या वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल दोनही लूकला चाहत्यांची पसंती मिळते. नुकतेच आयुषीने तिचे ट्रेडिशनल आउटफिटमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केलं आहेत. तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
आयुषी भावे ही अभिनेता सुयश टिळकची पत्नी आहे. याचवर्षी दोघे विवाह बंधनात अडकले. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. एका मुलाखती दरम्यान सुयशने सांगितले होते दोघांची ओळख कशी झाली होती. सुयश म्हणाला होता की, पहिल्याच भेटीत दोघांमध्येही खूप चांगली मैत्री झाली होती. बघता बघता दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. इतकेच काय तर दोघांच्याही आवडी - निवडी सारख्याच आहेत. पुण्याच्याच घरी कमी पाहुणे मंडळींच्या उपस्थित आमचा साखरपुडा पार पडला.
'का रे दुरावा' ही मालिका लोकप्रिय झाल्यानंतर सुयश 'बापमाणूस', 'दुर्वा' या मालिकांमध्येही झळकला होता. उत्तम अभिनयकौशल्य आणि शांत स्वभाव यामुळे सुयश आज लोकप्रिय अभिनेता आहे.आयुषी भावेसुद्धा सुयशप्रमाणेच अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी झळकली होती.