वेगवेगळ्या टीव्ही शोमध्ये ११ वेळा साकारली महादेवची भूमिका; अभिनेत्याने रचला अनोखा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:15 IST2025-02-24T18:14:44+5:302025-02-24T18:15:24+5:30
एक दोनदा नाही तर तब्बल ११ वेळा वेगवेगळ्या टीव्ही शोमध्ये 'महादेव'ची भूमिका साकारली आहे.

वेगवेगळ्या टीव्ही शोमध्ये ११ वेळा साकारली महादेवची भूमिका; अभिनेत्याने रचला अनोखा विक्रम
Tarun Khanna: महाशिवरात्री हा जगभरातील शिवभक्तांसाठी महत्त्वाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे. यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहे. 'महादेवा'चा महिमा मालिकांमधून घराघरात पोहचला आहे. अभिनेत्यांच्या रुपाने प्रेक्षकांना 'महादेव'चं दर्शन घडलं. असाच एक अभिनेता आहे, ज्याला 'महादेव'ची भूमिका साकारल्याने खरी ओळख मिळाली आणि लोकप्रियतेचं शिखर गाठता आलं. या अभिनेत्यानं एक दोनदा नाही तर तब्बल ११ वेळा वेगवेगळ्या टीव्ही शोमध्ये 'महादेव'ची भूमिका साकारली आहे.
भारतीय टीव्ही अभिनेता तरुण खन्ना हा पहिला अभिनेता आहे, ज्याने वेगवेगळ्या टीव्ही मालिकांमध्ये ११ वेळा एकच भूमिका साकारली आहे. असे करून त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. २०१५ मध्ये त्याला 'जय संतोषी माँ' मध्ये 'महादेव'ची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर फक्त एक वर्षानंतर तो २०१६ मध्ये 'कर्मदाता शनि' या शोमध्ये 'महादेव'च्या भूमिकेत दिसला. यानंतर, २०१८ मध्ये तरुणने परमवीर श्री कृष्णामध्येही 'महादेव'ची भूमिका साकारली.
तरुण खन्नाने २०१८ मध्ये 'राधा कृष्ण', २०१९ मध्ये 'लव कुश' आणि त्यानंतर 'नमः' मालिकेत 'महादेव'ची भूमिका साकारली. यानंतर पुन्हा एकदा तरुण खन्ना 'महादेव'ची भुमिका साकारणार आहेत. लवकरच सब टीव्हीवर एक नवीन मालिका सुरू होणार आहे, ज्याचे नाव आहे 'वीर हनुमान – बोलो बजरंग बली की जय'. या शोची घोषणा नुकतीच करण्यात आली असून या शोमध्येही अभिनेता तरुण खन्ना 'महादेव'च्या भूमिकेत दिसणार आहे.
गेल्या वर्षी तरुण कलर्स टीव्हीवरील 'शिवशक्ती' या मालिकेत 'भगवान इंद्र'च्या भूमिकेत दिसला होता. त्याला 'महादेव'व्यतिरिक्त इतर भूमिकांमध्येही दिसण्याची इच्छा होती. पण प्रेक्षकांनाही त्याला 'महादेव'च्या भूमिकेत पहायचं आहे आणि कदाचित देव 'महादेव' यांनाही तेच हवे आहे, म्हणूनच त्याला वारंवार 'महादेव'ची भूमिका ऑफर केली जाते.