'हर मर्द का दर्द' मालिकेतील अभिनेत्री झिनलने हे सीन्स करण्यास दिग्दर्शकाला दिला नकार?जाणून घ्या नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 06:55 AM2017-02-16T06:55:15+5:302017-02-16T12:25:15+5:30

सिनेमा किंवा मालिकांमध्ये एखादी भूमिका मिळावी, यासाठी नवे कलाकार कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात;तर दुसरीकडे झिनल बेलानी नवोदित अभिनेत्रीने ...

Actor Zinnal refused to give the lead to the 'Every Men's Pain' series, and what exactly did it happen? | 'हर मर्द का दर्द' मालिकेतील अभिनेत्री झिनलने हे सीन्स करण्यास दिग्दर्शकाला दिला नकार?जाणून घ्या नेमके काय घडले?

'हर मर्द का दर्द' मालिकेतील अभिनेत्री झिनलने हे सीन्स करण्यास दिग्दर्शकाला दिला नकार?जाणून घ्या नेमके काय घडले?

googlenewsNext
नेमा किंवा मालिकांमध्ये एखादी भूमिका मिळावी, यासाठी नवे कलाकार कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात;तर दुसरीकडे झिनल बेलानी नवोदित अभिनेत्रीने इंटिमेट सीन्स करण्यास साफ नकार दिला आहे.‘लाईफ ओके’वरील ‘हर मर्द का दर्द’ या नव्या विनोदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार्‍या झिनलने आपण कधीही इंटिमेट सीन्स देणार नाही असा कॉन्ट्रॅक्टच साईन करून दिला होता.मालिकेच्या टीमलाही माझ्या अटी मान्य होत्या.त्यामुळेच ही भूमिका स्विकारली असल्याचे तिने म्हटले आहे. परमित सेठी यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत फैझल रशीदच्या पत्नीची भूमिका झिनल साकारणार आहे.व्हॅलेंटाईन डेचा मुहुर्त साधत या मालिकेने छोट्या पडद्यावर एंट्री मारली आहे. अशा प्रसंगाबद्दल झिनल म्हणाली, “या मालिकेच्या कथानकाची माहिती मला देण्यात आली तेव्हा असा काही प्रसंग चित्रीत करावा लागेल, असं मला सांगण्यात आले नव्हते. पण एके दिवशी मालिकेचे दिग्दर्शक परमित सेठी यांनी आम्हा दोघांना बोलावलं आणि असा इंटिमेट सीन शूट करावा लागेल, असे सांगितले. मुळात हा प्रसंग बाथरूममध्ये शूट करायचा होता आणि त्यात फैझल आणि माझा एक किसींग सीन आणि काही शारीरिक जवळिकी असलेले  सीन्स शूट  करायचे होते. मात्र मी आधीपासूनच ठरवल्याप्रमाणे मला असे सीन्स शूट करताना संकोच वाटतो.”

तिने सांगितले, “मी असा प्रसंग करण्यास साफ नकार दिला. परमितने  मला या प्रसंगाचं महत्त्वही समजावून सांगितले. पण किसींग सीन्स आणि शारीरिक जवळिकीच्या प्रसंगांची काही आवश्यकता कशी नाही, ते ही त्यांना नीट  समजावून सांगितले. ही एक कौटुंबिक मालिका असल्याने तिच्यात अशा प्रसंगांची गरज नसल्याचे माझे ठाम मत होते. त्यामुळे आम्ही वेगळ्याच दिशेने जात असल्याचे चुकीचा संदेश रसिकांना मिळायला नको असे सतत वाटत असल्यामुळे मी त्यांना पटकथेत आवश्यक ते बदल  सुचवले. विशेष म्हणजे परमितनेही मला समजून घेत मी सुचवलेले बदल स्विकारत प्रकरण संपवले.''झिनलने किसींग सीन्स नाही दिले तरी तिचे चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतच राहतील असा माझा विश्वास असल्याचेही झिनलने सांगितले. 

Also Read:वैशाली ठक्कर आणि अनिता कन्वल परमीत सेठीच्या मालिकेद्वारे परतल्या छोट्या पडद्यावर

Also Read:'ओम शांती ओम' सिनेमातील दीपिका पादुकोणच्या 'रेट्रो' लूकची केली या अभिनेत्रीने कॉपी
 

Web Title: Actor Zinnal refused to give the lead to the 'Every Men's Pain' series, and what exactly did it happen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.