'लाल इश्क'साठी शूटिंग करताना कलाकारांना करावा लागला या गोष्टीचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 11:35 AM2019-09-21T11:35:30+5:302019-09-21T11:37:09+5:30
मालिकेच्या आगामी एपिसोड्समध्ये अरिना डे, शफाक नाझ आणि नील भट्ट सारखे प्रतिभावान कलाकार खास भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
लोकप्रिय काल्पनिक हॉरर मालिका 'लाल इश्क' कलाकार राहिल आझम व कंवर धिल्लनसह लक्षवेधक कथा सादर करणार आहे. हे दोन्ही अभिनेते काल्पनिक व सामाजिक नाट्यांमधील त्यांच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. मालिका प्रत्येक भूमिकेला अलौकिक शक्तीसंदर्भातील लुक देण्यासाठी उच्च दर्जाच्या ग्राफिक्सचा वापर करत आहे आणि प्रत्येक कथेचे वातावरण व सेटअप अगदी वास्तविक बनवत आहे. नेहमीच्या आऊटडोअर व इनडोअर लोकेशन्स ऐवजी निर्मात्यांनी नुकतेच घनदाट जंगलामध्ये शूटिंग करण्याचे ठरवले. पण वन्य प्राण्यांशी सामना होईल याचा त्यांनी विचार देखील केला नव्हता.
जंगलाच्या हिरवळीमध्ये शूटिंग करण्यासाठी अभिनेता राहिल आझम खूपच आनंदित होता. पण त्याला शूटिंग स्थळापासून काही अंतरावर एक सरपटणारा प्राणी दिसला आणि तो काहीसा घाबरून गेला. या घटनेबाबत बोलताना राहिल म्हणाला, ''लाल इश्क सारख्या एपिसोडिक मालकांसाठी शूटिंग करताना आम्हाला वेळेचे बंधन पाळावे लागतात. यावेळी आम्ही घनदाट जंगलाच्या सीमेवर सीनचे शूटिंग करत होतो आणि त्यामध्ये काही रिटेक्स घ्यावे लागतात. सीनचे अगदी योग्यपणे शूट करणे महत्त्वाचे होते. आम्ही शूटिंगला सुरूवात करताच मला एक विलक्षण आवाज ऐकायला आला. नीट पाहिले तर माझ्यापासून काहीच अंतरावर एक मोठा साप झुडुपांमधून जात होता. माझ्या मनात धडकीच भरली आणि मी क्षणासाठी स्तब्ध झालो. मी माझ्या मनातील भिती दूर केली आणि सीन पूर्ण केला. सीन पूर्ण झाल्यानंतर मी त्याबाबत प्रॉडक्शनला सांगितले. आम्ही त्वरित प्राणी बचाव समूहाला बोलावले, ज्यामुळे त्या सापाला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडता येईल. कोणलाच इजा झाली नाही, पण आम्हाला 'लाल इश्क'साठी शूटिंग करताना साहसी अनुभव मिळाला.''
अशीच घटना याच मालिकेच्या सेटवर घडली. अभिनेता कंवर धिल्लनला जवळपास एका क्रूर वन्य प्राण्याचा सामना करावा लागला. एका सीनसाठी शूटिंग करत असताना अभिनेत्याला झुडपांमधून हालचाल होत असल्याचा आवाज ऐकू आला आणि त्याच्या मनात विचार आला की, तो बिबट्या असू शकतो. पण झुडुपामधून एक हरिण चालत जात असल्याचे पाहिल्यानंतर त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. या भयानक अनुभवाबाबत बोलताना कंवर म्हणाला, ''सुरूवातीला मी हालचालींकडे दुर्लक्ष केले. मला वाटले की, हवेमुळे झुडुपांची हालचाल होत असेल. पण लवकरच मला प्राण्याच्या आकारासाखी आकृती दिसली. माझ्यासह संपूर्ण टीम घाबरून गेले आणि क्षणासाठी कोणीही एक शब्द देखील बोलला नाही किंवा त्यांच्या जागेवरून हलले नाहीत. काही सेकंदांनंतर आम्हाला हरणाचे शिंग दिसले आणि समजले की, बाजूने हरिण जात आहे. निश्चितच सेटवरील सर्वांसाठी तो भयानक अनुभव होता. हा निश्चितच माझा एक संस्मरणीय शूटिंग अनुभव असणार आहे.'' मालिकेच्या आगामी एपिसोड्समध्ये अरिना डे, शफाक नाझ आणि नील भट्ट सारखे प्रतिभावान कलाकार खास भूमिकांमध्ये दिसणार आहेत.