छोट्या पडद्यावरील कलाकार असं करणार नवीन वर्षाचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 08:19 PM2023-12-29T20:19:51+5:302023-12-29T20:20:20+5:30

झी मराठीच्या कलाकारांनी २०२४ चे स्वागत नवीन वर्ष कसे साजरे करणार आहेत, याबद्दल सांगितले.

Actors of small screen will welcome the new year like this | छोट्या पडद्यावरील कलाकार असं करणार नवीन वर्षाचं स्वागत

छोट्या पडद्यावरील कलाकार असं करणार नवीन वर्षाचं स्वागत

नवीन वर्षाची सुरूवात आपल्या माणसांसोबत आणि देवाच्या आशीर्वादाने होईल याहून चांगली गोष्ट काय असू शकते. झी मराठीचे कलाकार २०२४ चे स्वागत नवीन वर्ष कसे साजरा करणार आहेत याबाबत उत्साह व्यक्त करताना सांगितले.

'सारं काही तिच्यासाठी' मधली उमा खोत म्हणजेच  खुशबू तावडेने सांगितले, "मी २०२४ चे स्वागत आमच्या नवीन घरात ,माझ्या पूर्ण परिवार सोबत साजरा करणार आहे. घरात आवडते पदार्थ बनवून, छान बोर्ड गेम खेळू, त्या सोबत गप्पा गोष्टी  २०२३चे आठवणींना उजाळा देऊन आणि नवीन वर्षात काय-काय करायचे आहे त्या बदल भरपूर चर्चा करणार आहे.

पुण्यातील वेगवेगळ्या जागा एक्सप्लोअर करणार

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मधली श्वेता मेहेंदळे म्हणजेच इंद्राणी आपले जिवलग मित्र यश प्रधान,अपेक्षा चोक्सी आणि आपल्या परिवार सोबत नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे. मी आणि माझा परिवार पुण्याला जाणार आहोत यशच्या घरी. त्याची बायको अपेक्षा हिने नवीन कार घेतली आहे आणि ती आम्हाला फिरवणार आहे. आम्ही पुण्याच्या जवळपास वेगवेगळ्या जागा फिरणार आहोत. मढेघाट, पाबेघाट अश्या वेगवेगळ्या सुंदर जागांना शोधून एक्सप्लोर करण्याचा आमचा प्लॅन आहे. 

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाणार

'अप्पी आमची कलेक्टर' मधला तुम्हा सर्वांचा लाडका अर्जुन म्हणजे रोहित परशुरामने सांगितले की, मी नवीन वर्षाचं स्वागत पत्नी पूजा आणि लेकी सोबत करणार आहे. आम्ही दर वर्षी  ३१ डिसेंबरला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जातो. नवीन वर्षाचं आगमन महालक्ष्मीच्या दर्शनाने आणि तिच्या आशीर्वादने  सुरु करणार इतकं सुख कशातच नाही फक्त या वर्षी आमच्या सोबत आमचं पिलू म्हणजे माझी लाडकी लेक रुई असणार आहे. 
 

Web Title: Actors of small screen will welcome the new year like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.