अश्लील मेसेज अन् जिवंत जाळण्याची धमकी! सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 11:07 IST2025-03-23T11:07:30+5:302025-03-23T11:07:57+5:30

मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

actress angel rai got Obscene messages and threat to burn alive actress filed fir | अश्लील मेसेज अन् जिवंत जाळण्याची धमकी! सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; FIR दाखल

अश्लील मेसेज अन् जिवंत जाळण्याची धमकी! सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; FIR दाखल

मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही अभिनेत्री आहे एंजल राय. मुंबईत गोरेगाव येथील बांगुर नगरमध्ये राहणाऱ्या एंजलला (angel rai) गेल्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांना वैतागून एंजलने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून याप्रकरणी FIR नोंदवला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

अभिनेत्रीला मिळाली जिवंत जाळण्याची धमकी

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री एंजल रायला गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मेसेज असणारे ई-मेल्स येत आहेत. इतकंच नव्हे तर तो व्यक्ती तिला जिवंतपणी जाळण्याचा आणि शरीराचे तुकडे करण्याची धमकी देत आहे. अभिनेत्रीला यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतोय. अभिनेत्रीची आगामी वेबसीरिज 'घोटाला'चा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला त्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून येणाऱ्या धमक्यांचं प्रमाण वाढलं, असा दावा तिने केलाय. 




वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने अभिनेत्रीने घाबरुन पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी आणखी तपास करण्यात येणार आहे. अभिनेत्री एंजल रायचे सोशल मीडियावर २५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिची आगामी वेबसीरिज घोटाला २९ मार्चला रिलीज होणार आहे. दरम्यान धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी अभिनेत्रीला आशा आहे.

Web Title: actress angel rai got Obscene messages and threat to burn alive actress filed fir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.