अंजली प्रियाला सगळ्या कामात व्हायचे आहे पारंगत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 12:55 PM2019-04-12T12:55:45+5:302019-04-12T13:02:12+5:30
अंजली एक प्रशिक्षित कथक नर्तक आहे. ह्याव्यतिरिक्त ती शूटिंगच्या दरम्यान बेली डान्सच्या काही स्टेप्स शिकण्यात व्यस्त असते.
कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवत कलाकार त्या क्षणाचा आनंद घेत असतात. प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. असाच काहीसा छंद अभिनेत्री अंजली प्रियालाही आहे. 'मै भी अर्धांगिनी' या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत आहे.
अंजली एक प्रशिक्षित कथक नर्तक आहे. ह्याव्यतिरिक्त ती शूटिंगच्या दरम्यान बेली डान्सच्या काही स्टेप्स शिकण्यात व्यस्त असते. तिला गायला आवडते. अंजलीने मार्शल आर्टचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे आणि तलवारबाजीचे काही धडे गिरवले आहेत. तिला रिकाम्या वेळात डुडलिंग करायला आवडते.
'मै भी अर्धांगिनी' मालिकेतील भूमिका अंजलीच्या प्रत्यक्ष आयुष्याशी मिळतीजुळती आहे. बरेचजण मानतात की, एकाचवेळी अनेक गोष्टींवर लक्ष देणे आर्थिकदृष्ट्या सशक्त बनण्याऐवजी कमकुवत होण्यासारखे आहे. परंतु अंजलीला असे वाटत नाही. अंजली म्हणते, "तुमच्याकडे एकच आयुष्य आहे त्यामुळे तुम्हाला जे काही आवडतं ते शिका, मग ते नृत्य असो, लेखन किंवा जे काही ट्रेंडिंग असेल ते."
ह्या नायिकेकडे अशा वस्तूंची यादी आहे ज्याचा तिला कलात्मक पद्धतीने शोध घ्यायचा आहे आणि प्रत्येकवेळी ती जेव्हा नवीन काही शिकते तेव्हा यादीतून ते काढून टाकते. अंजली वर्षातले दोन महिने वेळ घेते आणि त्या वेळेचा उपयोग ती रोमांचक असे नवीन काहीतरी शिकण्यासाठी करते. ती पुढे सांगते, "स्वातंत्र्य अनुभवा आणि वेगवेगळ्या गोष्टींचा पाठलाग करा, अशाने तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल आणि आयुष्यात आणखी उत्साह येईल."