अंकिता-विकी जैनच्या घरी चिमुकलीचं आगमन, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 10:59 AM2024-09-03T10:59:14+5:302024-09-03T11:02:04+5:30

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. याचा एक व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Actress Ankita Lokhande and Vicky Jain welcomed a new pet cat Mau Lokhande Jain watch video | अंकिता-विकी जैनच्या घरी चिमुकलीचं आगमन, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

अंकिता-विकी जैनच्या घरी चिमुकलीचं आगमन, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

Ankita Lokhande and Vicky Jain Became Parents : अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैन हे चर्चेत असणार कपल आहे. अंकिता आणि विकी हे वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. सध्या या कपलनं सर्वांच लक्ष वेधलं आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. याचा एक व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. अंकिता लोखंडे आणि विकी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनं सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. 

अंकिता व विकी यांनी एक मांजर घरी आणली आहे. या मांजरीचे आई-बाबा झाल्याचं अंकितानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी या मांजरीचं नाव माऊ लोखंडे जैन असं ठेवलं आहे. अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते  एका गोंडस मांजरीचे त्यांच्या घरात स्वागत करताना दिसत आहेत. या क्लिपमध्ये हे जोडपे मांजरासोबत खेळताना, मिठी मारताना आणि प्रेमळपणा करताना दिसत आहे.


अंकिताने व्हिडिओ शेअर करत लिहिलं, "कुटुंबात तुझं स्वागत आहे, आमची छोटी राजकुमारी माऊ लोखंडे जैन. तु आमच्या कुटुंबातील नवी सदस्य आहेस, आई आणि बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात. तु आमचं हृदय चोरले आहे. तुझे छोटे-छोटे पंजे आमच्या आयुष्यात खूप सारा आनंद घेऊन येवोत. माऊ, आमची गोड मुलगी!" असं कॅप्शन अंकिताने या व्हिडीओला दिलं आहे.


अंकिता लोखंडे व विकी जैन या दोघांच्या लग्नाला येत्या १४ डिसेंबरला तीन वर्षे होतील. दोघांनी १४ डिसेंबर २०२१ मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं होतं. विकीशी लग्न करण्यापुर्वी अंकिता ही बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत अंकिता रिलेशनशीपमध्ये होती. दोन वर्षापूर्वी सुशांतने आत्महत्या केली त्याआधीच अंकिता आणि सुशांतचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर अंकिताच्या आयुष्यात उदयोगपती विक्की जैन आला. तर अंकिताला भेटण्यापुर्वी विकी हा टिया बाजपेई हिला डेट करत होता. अनेक वर्ष टिया आणि विकी रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 

Web Title: Actress Ankita Lokhande and Vicky Jain welcomed a new pet cat Mau Lokhande Jain watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.