'प्रेमाची गोष्ट'मध्ये अपूर्वा नेमळेकर दिसणार ग्लॅमरस भूमिकेत, अभिनेत्रीच्या लूकची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 13:39 IST2023-08-21T13:38:59+5:302023-08-21T13:39:36+5:30
Apurva Nemlekar :अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एका लक्षवेधी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सावनी असं तिच्या भूमिकेचं नाव असून अतिशय ग्लॅमरस असं हे पात्र आहे.

'प्रेमाची गोष्ट'मध्ये अपूर्वा नेमळेकर दिसणार ग्लॅमरस भूमिकेत, अभिनेत्रीच्या लूकची होतेय चर्चा
स्टार प्रवाह वाहिनीवर 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही नवीन मालिका ४ सप्टेंबरपासून भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोजला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून नव्या पात्रांना भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एका लक्षवेधी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सावनी असं तिच्या भूमिकेचं नाव असून अतिशय ग्लॅमरस असं हे पात्र आहे.
सावनी या पात्राविषयी सांगताना अपूर्वा नेमळेकर म्हणाली, ‘स्टार प्रवाहसोबत जवळपास ८ वर्षांनी पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आला आहे. या मालिकेत मी खलनायिका साकारते आहे. खलनायिका जरी साकारत असले तरी या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. सावनी हे पात्र उभं करताना अभिनेत्री म्हणून माझा कस लागतोय. या भूमिकेसाठी मी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करतेय. माझ्या लूकवर खूप मेहनत घेतली जातेय. मी या भूमिकेसाठी बरचसं वजनही कमी केलंय.
ती पुढे म्हणाली की, सावनी अतिशय ग्लॅमरस आहे. त्यामुळे साड्यांपासून ते अगदी तिच्या दागिन्यांपर्यंत सगळं खूपच खास असणार आहे. मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी अशी ही भूमिका आहे. प्रेक्षकांनी मला माझ्या प्रत्येक कामात मोलाची साथ दिली आहे. हीच साथ आणि प्रेम माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.