अभिनेत्री आर्या वोराने केली दुबईची सफर, फिरली खाजगी विमान आणि बोटीतून, एकदा तिचे फोटो बघाच !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 12:21 PM2021-01-21T12:21:43+5:302021-01-21T12:22:08+5:30
'देवों के देव महादेव' टेलिव्हिजन मालिका, माय फ्रेंड गणेशा आणि क्लिक सिनेमामधून झळकलेल्या आर्या वोराने लॉकडाऊन मध्येच स्वत:चे युट्यूब चॅनल सुरू केले होते.
भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात.विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे पर्यटनस्थळांवरील फोटो शेअर करत असतात.
अभिनेत्री आर्या वोरा अभिनयापेया भटकंती करताना जास्त दिसते. उत्तम फॅशन आणि लाईफस्टाईल ब्लॉगरही आहे. तिच्या युट्यूब व्हिडीओजना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. ती सध्या दुबईमध्ये फिरत आहे. तिचे दुबईचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
तिने चक्क दुबईत खाजगी विमान आणि आलिशान बोट बूक करून आनंद लुटला आहे. 'देवों के देव महादेव' टेलिव्हिजन मालिका, माय फ्रेंड गणेशा आणि क्लिक सिनेमामधून झळकलेल्या आर्याने लॉकडाऊन मध्येच स्वत:चे युट्यूब चॅनल सुरू केले होते. कमीवेळेतच तिच्या सोशल मीडियावरील फॅन फॉलोवरचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.
आपल्या व्हिडीयोब्लॉगव्दारे आपल्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या आर्याने लॉकडाऊननंतर उदयपूर, अमृतसर, हिमाचलप्रदेश आणि गोव्यात सोलो प्रवास केला. त्यानंतर ती दुबईला रवाना झाली. दुबईत तीने खाजगी विमान आणि आलिशान बोटीतून प्रवास केला. त्याविषयी ती सांगते, “दुबईत मी फिरत असताना मला समजलं की काही तासांकरीता खाजगी विमान आणि खाजगी बोटीची सुविधा आहे.
त्यामुळे मला पायलट फरीद लफ्ता यांनी रस अल खैमा याठीकाणी विमानाची रोमांचक सफर घडवली. त्या सुंदर विमानातून दुबईचे नजारे डोळ्याचं पारणं फिटवणारे होते. त्यानंतर दुस-यादिवशी मी मरीना तलावात एक खाजगी बोट भाड्याने घेतली आणि त्यात दिवसभर बोटीतून प्रवास केला.
त्या लक्झरीअस बोटीत स्टॅनली पॉल या फोटोग्राफरने माझं छानसं फोटोशुट केलं. संपूर्ण बोट ही आलिशान होती. आणि तिथे खाण्यापिण्याची उत्तम सोय होती. माझ्या बकेट लीस्टमधल्या या दोन गोष्टी पूर्ण झाल्यामुळे मला फार आनंद होत आहे. ”