"मुंबईतील बरेच लोक प्रेमळ नाहीत" अभिनेत्री असं का म्हणाली? करण सिंह ग्रोवरसोबत होतं अफेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:44 IST2025-04-01T14:42:02+5:302025-04-01T14:44:11+5:30
अभिनेत्री करण सिंह ग्रोवरच्या प्रेमात होती पण नंतर...

"मुंबईतील बरेच लोक प्रेमळ नाहीत" अभिनेत्री असं का म्हणाली? करण सिंह ग्रोवरसोबत होतं अफेअर
बंगाली तसंच हिंदी सिनेमा, मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री बरखा बिष्ट(Barkha Bisht). अभिनेत्रीचा २ वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला. अभिनेता इंद्रनील सेनगुप्तासोबत (Indraniel Sengupta) तिचा १३ वर्षांचा संसार मोडला. इंद्रनीलचे विवाहबाह्य संबंध असल्याने त्यांचा घटस्फोट झाल्याचं नंतर समोर आलं. बरखाने नुकतंच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यामध्ये तिने करण सिंह ग्रोवरसोबतच्या रिलेशनशिपवरही भाष्य केलं.
बरखा बिष्ट आणि करण सिंह ग्रोवर काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करायचे. तेव्हा दोघंही इंडस्ट्रीत नवीन होते आणि एका मालिकेत एकत्र काम करत होते. मालिकेच्या सेटवरच त्यांची भेट झाली. करण सिंह ग्रोवर तेव्हापासूनच दिसायला हँडसम, गुड लुकिंग, सिक्स पॅक अॅब्स अशआ लूकमध्येच असायचा. त्यामुळे साहजिक बरखाही त्याच्या प्रेमात पडली. करणसिंह ग्रोवरबद्दल बरखा म्हणाली, "मी आणि करण एकमेकांना डेट करत होतो. तो दिसायला चांगला होता, ग्रेट बॉडी आणि त्याच्यात एक अॅटिट्यूड होता. कारण तो खूप प्रेमळ व्यक्ती होता. कारण प्रेमळ व्यक्ती मला आकर्षित करतात. मुंबईत बरेचसे लोक प्रेमळ नसतात. त्यामुळे जिथे प्रेमळ लोक दिसतात मी आकर्षित होते. तेव्हा मी २३ वर्षांचीच होते लहान होते. आमचं ते बालवयातलं प्रेम होतं."
नातं का तुटलं? यावर बरखा म्हणाली, "आम्ही खूप लहान होतो. काळानुसार आमच्या वागण्यातही बदल होत गेला आणि आम्ही विभिन्न बनलो. आमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यात तो माझ्यापेक्षा २ वर्ष छोटा होता. त्यामुळे आमच्यातील समंजसपणा तसा कमी होता. आमच्यात मोठा फरक आला होता. म्हणूनच आमचं नातं तुटलं."