ठरलं तर मग! ही अभिनेत्री-नृत्यांगना 'बिग बॉस मराठी ५' मध्ये करणार एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 10:33 AM2024-07-23T10:33:04+5:302024-07-23T10:34:09+5:30

'बिग बॉस मराठी ५' मध्ये मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध नृत्यांगना-अभिनेत्री सहभागी होणार आहे. तुम्ही ओळखलं? (bigg boss marathi 5)

actress dancer manasi naik or gautami patil enter in Bigg Boss Marathi 5 riteish deshmukh | ठरलं तर मग! ही अभिनेत्री-नृत्यांगना 'बिग बॉस मराठी ५' मध्ये करणार एन्ट्री?

ठरलं तर मग! ही अभिनेत्री-नृत्यांगना 'बिग बॉस मराठी ५' मध्ये करणार एन्ट्री?

'बिग बॉस मराठी ५' ची उत्सुकता शिगेला आहे. अवघ्या सहा दिवसात 'बिग बॉस मराठी ५' टीव्हीवर सुरु होणार आहे. रितेश देशमुख यंदाच्या सीझनचं सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. गेल्या चार सीझनचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं. पण यंदाच्या सीझनचं होस्टिंग रितेश देशमुख करणार आहे. अशातच 'बिग बॉस मराठी ५'मध्ये जाणाऱ्या पहिल्या स्पर्धकाची अधिकृत घोषणा झाली असून मानसी नाईक 'बिग बॉस मराठी ५'मध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मानसी नाईक जाणार 'बिग बॉस मराठी ५'मध्ये?

'बिग बॉस मराठी ५' विषयी कलर्स मराठीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकलीय. 'घरी जाण्यास उशीर झाला की हिचे वाजतात १२, कोण आहे ही?' अशी पोस्ट कलर्स मराठीने टाकलीय. या पोस्टखाली लोकांनी चार नावांचा अंदाज बांधलाय. गौतमी पाटील, मानसी नाईक, अमृता खानविलकर, बेला शेंडे अशी ही चार नावं आहेत. या चारपैकी मानसी नाईकबद्दल खूप कमेंट आल्या आहेत. त्यामुळे मानसी नाईक 'बिग बॉस मराठी ५'मध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मानसी नाईकबद्दल...

मानसी नाईक ही गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. मानसी नाईक अभिनेत्री आहेच शिवाय ती लोकप्रिय नृत्यांगनाही आहे. मानसीचं वैयक्तिक आयुष्य खुप वादग्रस्त ठरलं. मानसीने पंजाबचा बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्न केलं होतं. पण दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नानंतर काहीच दिवसांमध्ये मानसीने प्रदीपसोबत घटस्फोट घेतला. मानसी सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत नाहीय. त्यामुळे 'बिग बॉस मराठी ५'मध्ये मानसी दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

Web Title: actress dancer manasi naik or gautami patil enter in Bigg Boss Marathi 5 riteish deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.