TMKOC: एका एपिसोडमध्येच लाखो कमवायची दयाबेन, शोमध्ये सर्वाधिक कमाई करणारी तिसरी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 02:00 PM2024-06-24T14:00:09+5:302024-06-24T14:00:54+5:30

दिशा वकानीचा पहिला पगार किती होता माहितीये का? काय केलं त्या पगाराचं वाचा

actress Disha Vakani used to earn lakhs for just one episode of TMKOC know about her first salary | TMKOC: एका एपिसोडमध्येच लाखो कमवायची दयाबेन, शोमध्ये सर्वाधिक कमाई करणारी तिसरी अभिनेत्री

TMKOC: एका एपिसोडमध्येच लाखो कमवायची दयाबेन, शोमध्ये सर्वाधिक कमाई करणारी तिसरी अभिनेत्री

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही एव्हरग्रीन पात्र आहेत. दयाबेनचा साधेपणा, बोलण्याची स्टाईल, गरबा करण्याचा भन्नाट अंदाज हे सगळंच प्रेक्षकांना हसवणारं होतं. अभिनेत्री दिशा वकानीने (Disha Vakani)  दयाबेनची भूमिका साकारली होती. मात्र गेल्या ७ वर्षांपासून दयाबेन मालिकेतून गायब आहे. तिची कमी सगळ्यांनाच जाणवते. तुम्हाला माहितीये का दिशा वकानी एका एपिसोडसाठी किती रुपये मानधन घ्यायची?

दिशा वकानीने एका मुलाखतीत तिच्या पहिल्या पगाराविषयी सांगितले होते. एका ड्रामासाठी तिला फक्त २५० रुपये मिळाले होते. हे पैसे तिने वडिलांना दिले होते. दिशाचे वडील भीम वकानी सुद्धा तेव्हा गुजरातमधील प्रसिद्ध थिएटर आर्टिस्ट होते. लेकीचा पहिला पगार बघून ते भावूक झाले होते. 

'तारक मेहता...'च्या प्रत्येक एपिसोडसाठी मिळायचे इतके पैसे

दिशा वकानीला दयाबेन या भूमिकेसाठी प्रत्येक एपिसोडसाठी 1.25 लाख रुपये मिळायचे. एवढे पैसे कमावणारी ती मालिकेतील तिसरी अभिनेत्री होती. पहिल्या क्रमांकावर दिलीप जोशी तर दुसऱ्या क्रमांकावर शैलेश लोढा होते. 

२०१७ मध्ये दिशाने पहिल्या बाळाला जन्म दिला.  यानंतर मात्र ती मालिकेत परतलीच नाही. काही महिन्यात ती पुन्हा काम सुरु करेल अशी सर्वांना आशा होती. मात्र गेल्या ७ वर्षांपासून दयाबेनच्या शिवायच मालिका सुरु आहे. दिशाने 2015 साली बिझनेसमन मयूर पडियासोबत लग्न केले होते. २०१७ साली तिने मुलीला जन्म दिला. तर २०२२ साली तिने मुलाला जन्म दिला. काही दिवसांपूर्वीच दिशाची एका कार्यक्रमात झलक दिसली होती. यामध्ये ती पती आणि मुलांसोबत आली होती.

Web Title: actress Disha Vakani used to earn lakhs for just one episode of TMKOC know about her first salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.