भूकंपाचे धक्के अन् अभिनेत्रीला येतीये मजा? Video शेअर करत म्हणाली, 'भारी वाटतंय...' होतेय ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 09:02 AM2023-03-24T09:02:27+5:302023-03-24T09:02:54+5:30
एकीकडे भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले तर दुसरीकडे दिव्यांकाला मजा येत होती.
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) टेलिव्हिजन विश्वातील सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे. 'ये है मोहोब्बते' (Ye Hai Mohobbatein) मालिकेतून ती घराघरात पोहोचली. अभिनयासोबतच लोकांना तिचं एकंदर व्यक्तिमत्वही आवडतं. मात्र नुकतंच तिने असं काही केलं आहे ज्यामुळे तिने चाहत्यांची नाराजी ओढवून घेतली आहे.तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यावरुन चाहते तिला खडेबोल सुनावत आहेत. नक्की काय प्रकरण आहे बघुया.
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे झटके जाणवले. अनेक लोक घाबरुन घरबाहेर आले होते. भूकंपाची तीव्रताही जास्त होती. तेव्हा अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी चंदीगढ मध्ये होती. तिचा पती विवेक दहियाही सोबत होता. जेव्हा सगळे लोक भीतीने घराबाहेर आले होते तेव्हा दिव्यांकाने इन्स्टाग्राम लाईव्ह केले. भूकंप होत असताना ती फारच खुशीत होती. आयुष्यात पहिल्यांदाच अशी घटना पाहत आहे असं म्हणत तिला फार मजा येत होती. ती व्हिडिओत म्हणते, 'मी पहिल्यांदाय भूकंपाचा अनुभव घेत आहे. फारच मजा येत आहे. सगळी सोसायटी खाली आली आहे. चंदीगढमध्ये आम्ही आहोत आणि फारच मजा येत आहे पण फक्त आता जोपर्यंत हे अजून तीव्र होत नाही.'
IS SHE FR???? pic.twitter.com/XxMT54dkqV
— 🇵🇰💫 (@SyedaaMahamm) March 22, 2023
दिव्यांकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. तिला मजा येत असली तरी चाहते मात्र नाराज झाले आहेत. 'खरंच! फुटेजसाठी काहीही.', 'या साऱ्या टीव्हीवरच्या सुना...शो मध्येच भोळ्या बनतात. खऱ्या आयुष्यात सगळ्या सारख्याच. असंवेदनशील.'
दिव्यांका त्रिपाठी 'बनू मै तेरी दुल्हन', 'ये है मोहोब्बते' या मालिकांमधून प्रसिद्ध झाली आहे. याशिवाय ती डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए सीजन 8' ची विजेती राहिली आहे. तिने 2021 मध्ये 'खतरो के खिलाडी' मध्येही सहभाग घेतला होता. यामध्ये ती फर्स्ट रनर अप ठरली.